
Top FIIs Investment Shift: Foreign investors withdrew Rs 80,000 crore from 10 giant companies in India
Top FIIs Investment Shift: भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार अर्थात FIIs मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीतून माघार घेत असल्याचे दिसून येत आहे. टीसीएस,आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या भारतातील 10 दिग्गज कंपन्यांतून गेल्या वर्षभरात परदेशी गुंतवणूकदारांनी 80,000 कोटी गुंतवणूक रद्द करून दुसऱ्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक केली. या कंपन्यातून भारतीय शेअर्समधील हिस्सेदारी परदेशी गुंतवणूकदारांनी अधिक कमी केल्याने गेल्या काही वर्षात सर्वात कमी झाली आहे.
या 10 कंपन्यांना मोठा फटका?
देशातील सर्वात मोठी आयटी क्षेत्रातील कंपनी असलेली टीसीएसला या FIIs मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. टीसीएसमधून परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर तिमाहीत अंदाजे 12,911 कोटी रुपये काढले असून त्यांची हिस्सेदारी आता 11.05 टक्क्यांवरून घसरून 10.3 टक्के झाल्याने टीसीएसला मोठा फटका बसला आहे. तसेच, रिलायन्स इंडस्ट्रीजमधूनही परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 10,042 कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी घेतली. यामुळे FIIs ची रिलायन्स इंडस्ट्रीजमधील हिस्सेदारी 19.2% वरून 18.7% पर्यंत घटली आहे. ‘Eternal’ (झोमॅटो) सारख्या कंपनीला सुद्धा याचा सामना करावा लागला असून परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 9,854 कोटी रुपये काढून त्यांची हिस्सेदारी 42.3% वरून 39% पर्यंत घटवली आहे.
आयसीआयसीआय बँकेतून परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 9,375 कोटी रुपये गुंतवणूक रद्द केली असून यामुळे त्यांची हिस्सेदारी आयसीआयसीआय बँकेतील 46.8 % वरून 45.6 % पर्यंत खाली घसरली. याशिवाय भारतातल्या कोटक महिंद्रा बँक,ॲक्सिस बँक, टायटन, एचसीएल टेक, इन्फोसिस, एचडीएफसी यांसारख्या कंपन्यांमधूनही FIIs पैसे काढून घेतले आहेत.
या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारात सुद्धा दिसायला लागला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढल्याने गेल्या तीन महिन्यात टीसीएसचे शेअर्स 16.6% नी घातले आहेत. तर, एचसीएल टेक 19.9% आणि इन्फोसिस 10% खाली घसरले आहेत.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच! तुमच्या शहरात काय आहेत आजचे दर? जाणून घ्या
कुठल्या स्टॉक्समध्ये ओघ वाढला?
परंतु, काही भारतीय कंपन्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवली आहे. या गुंतवणूक कंपन्यांमध्ये येस बँकसह मारुती सुझुकी, वारी एनर्जी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, FIIs ने येस बँकमध्ये सुमारे १२,५४८ कोटी रुपयांची अधिक गुंतवणूक केली आहे. FIIs ने एका विशेष सेक्टरमध्ये इन्वेस्ट केले आहे. कंज्यूमर डिस्क्रिशनरीमध्ये FIIs ने गुंतवणूक केली आहे. मात्र, बँकिंग, विमा सारख्या फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सर्वाधिक पैसे माघारी घेतली आहे.