Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता
नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. यानंतर आज या निवडणूकीचा निकाल जाहिर केला जाणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत मजमोजणीच्या निकालावरून बिहारमध्ये कोणाची सत्ता असेल याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. बिहार निवडणुकीचा परिणाम आता शेअर बाजारावर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज बिहार निवडणुकीच्या निकालांपूर्वीही भारतीय शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार नाकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,८४४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ११० अंकांनी कमी होता. गुरुवारी, उच्च पातळीवर नफा बुकिंग दरम्यान भारतीय शेअर बाजार स्थिर राहिला. सेन्सेक्स १२.१६ अंकांनी म्हणजेच ०.०१% ने वाढून ८४,४७८.६७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३.३५ अंकांनी म्हणजेच ०.०१% ने वाढून २५,८७९.१५ वर बंद झाला. गुरुवारी बाजारात झालेल्या वाढीनंतर आज शेअर बाजारात नाकारात्मक सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, ऑइल इंडिया, मॅरिको, एमआरएफ, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट, हिरो मोटोकॉर्प, एनबीसीसी इंडिया, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, टाटा मोटर्सचा सीव्ही, निप्पॉन लाईफ इंडिया एएमसी, भारत डायनॅमिक्स, टाटा स्टील, स्पाइसजेट, अपोलो टायर्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये गोकुळ अॅग्रो रिसोर्सेस, गोल्डियम इंटरनॅशनल, अॅपेक्स फ्रोझन फूड्स, कॅरारो इंडिया आणि डॉ. अग्रवाल हेल्थ केअर यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये वरुण बेव्हरेजेस, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर (FACT) यांचा समावेश आहे.
“वज्रटिक हार, चंपली हार,…” महाराष्ट्राचा वारसा! “राजश्री” खास ब्रायडल कलेक्शन
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये AAVAS फायनान्सियर्स लिमिटेड, वेदांत लिमिटेड, NTPC लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ब्लॅक बॉक्स लिमिटेड आणि स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड यांचा समावेश आहे.






