Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळे वटारणारा देश नरमला; आर्थिक प्रगतीसाठी वापरणार भारतीय युपीआय पेमेंट प्रणाली!

आता मालदीवमध्येही युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये याबाबत महत्वपूर्ण करार झाला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यादरम्यान हा करार झाला. गेल्या वर्षी मालदीवने भारतावर डोळे वटारणे सुरु केले होते. ज्यामुळे अनेक बाबतीत दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र, आता मालदीव काहीसा नरमला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 10, 2024 | 10:04 PM
डोळे वटारणारा देश नरमला; आर्थिक प्रगतीसाठी वापरणार भारतीय युपीआय पेमेंट प्रणाली!

डोळे वटारणारा देश नरमला; आर्थिक प्रगतीसाठी वापरणार भारतीय युपीआय पेमेंट प्रणाली!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या वर्षी भारतासाठी डोळे वटरणारा मालदीव आता काहीसा नरमला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. मालदीवने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे केवळ भव्य स्वागतच केले नाही तर अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. यापैकी एक महत्वाचा करार युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) शी संबंधित आहे. UPI द्वारे तुम्ही आम्ही मोबाईलद्वारे अत्यावश्यक गोष्टींसाठी पेमेंट करतो. या करारानंतर आता मालदीवमध्येही नागरिक UPI द्वारे पेमेंट करू शकणार आहे. सध्याच्या घडीला अनेक देश भारतीय UPI प्रणालीचा वापर करत आहेत.

जयशंकर यांची ‘एक्स’ पोस्टद्वारे माहिती

मालदीवमध्ये डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि मालदीवचे आर्थिक विकास आणि व्यापार मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार झाला. याबाबत जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली आहे. तत्पूर्वी, जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी भारतातील UPI ने डिजिटल व्यवहारात कशी क्रांती घडवून आणली आहे, याबाबत त्यांनी माहिती जाहीर केली आहे.
(फोटो सौजन्य : एक्स हॅन्डल)

 

I am pleased to witness with External Affairs Minister @DrSJaishankar the Exchange of the MoU between Ministry of Economic Development and Trade of Maldives and National Payments Corporation of India (NPCI). The MoU will amplify the international finance opportunities, attracting… pic.twitter.com/r7FFwYcZQD — Moosa Zameer (@MoosaZameer) August 9, 2024

हेही वाचा : नोकरी सोडा… स्टार्टअप सुरू करा; सरकार देणार महिना 25000 रुपये; वाचा… काय आहे ‘ही’ योजना!

डिजिटल इनोव्हेशन आणण्यास मदत होणार

मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी यावेळी सांगितले की, “दोन्ही देशांमधील UPI करारामुळे मालदीवमध्ये डिजिटल इनोव्हेशन आणण्यास मदत होणार आहे. यूपीआय सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम येथील पर्यटनावरही दिसून येईल. UPI सेवा सुरू झाल्यामुळे लोक तात्काळ पेमेंट करू शकतील, ज्यामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळेल.”

‘या’ देशांमध्ये सेवा आधीच कार्यरत

UPI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने विकसित केले आहे. UPI च्या वापरामुळे मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतात. तुम्ही तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात त्वरित पैसे पाठवू शकतात. भारताची UPI सेवा अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. यामध्ये भूतान, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर आणि यूएई यांचा देखील समावेश आहे. अशातच आता या यादीत मालदीवचाही समावेश झाला आहे.

Web Title: Upi service in maldives important agreement between india and maldives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 10:03 PM

Topics:  

  • Maldives

संबंधित बातम्या

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती
1

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

‘इंडिया इन, चायना आउट’ ; मालदीवमध्ये पंतप्रधान मोदींच्या दबदबा अन् चीनला लागली मिर्ची? केली नाराजी व्यक्त 
2

‘इंडिया इन, चायना आउट’ ; मालदीवमध्ये पंतप्रधान मोदींच्या दबदबा अन् चीनला लागली मिर्ची? केली नाराजी व्यक्त 

समुद्राच्या कुशीत वसलेले बौद्ध राष्ट्र कसे बनले इस्लामिक? जाणून घ्या यामागची रंजक कहाणी
3

समुद्राच्या कुशीत वसलेले बौद्ध राष्ट्र कसे बनले इस्लामिक? जाणून घ्या यामागची रंजक कहाणी

मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी; एस. जयशंकर यांनीही दिल्या शुभेच्छा
4

मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी; एस. जयशंकर यांनीही दिल्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.