Indians ditch Turkey-Azerbaijan pick Vietnam-Indonesia
India travel boycott Turkey Azerbaijan : भारतीय पर्यटकांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन झपाट्याने बदलत आहे. एकेकाळी तुर्की आणि अझरबैजानसारख्या देशांच्या निसर्गसंपन्न निसर्गदृश्यांवर आणि सांस्कृतिक समृद्धीवर फिदा झालेले भारतीय, आता या ठिकाणांपासून दूर जाताना दिसत आहेत. अगदी मालदीवसारखे लक्झरी डेस्टिनेशनही भारतीय पर्यटकांच्या यादीतून हळूहळू गळून पडताना दिसत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय कारवाईवर तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे भारतीयांच्या भावनांना धक्का बसला. परिणामी, सोशल मीडियावर #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan या मोहिमा जोर धरू लागल्या.
त्याचा थेट परिणाम पर्यटनावर दिसून आला. मे २०२५ मधील आकडेवारीनुसार तुर्कीतील भारतीय पर्यटकांची संख्या २४% नी तर अझरबैजानमधील २१% नी घसरली आहे. व्हिसा अर्जांत तब्बल ४२% घट झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
भारतीय पर्यटकांचे एकेकाळचे आवडते ‘ड्रीम डेस्टिनेशन’ असलेले मालदीवही आता पसंतीतून बाहेर पडले आहे. कारण म्हणजे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांची भारतविरोधी भूमिका आणि भारतीय सैनिकांना परत बोलवण्याचा निर्णय. यावर भारतात मोठ्या प्रमाणावर बहिष्कार मोहिमा राबविल्या गेल्या. लोकांनी #VisitLakshadweep हा हॅशटॅग ट्रेंड करून पर्याय दिला. परिणामी, काही महिन्यांतच मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या ३८% वरून ४१% नी कमी झाली, तर लक्षद्वीपला भेट देणाऱ्यांची संख्या दुप्पट वाढली आहे.
भारतीय पर्यटकांची पसंती आता आग्नेय आशियाई देशांकडे वळताना दिसते. व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि इजिप्तसारख्या देशांसाठी व्हिसा अर्जांत तब्बल ३१% वाढ झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे व्हिसा सुलभता, थेट उड्डाणे आणि किफायतशीर खर्च. उदाहरणार्थ, इंडिगोने मुंबई-जकार्ता दरम्यान थेट उड्डाण सुरू केल्याने इंडोनेशिया सहज गाठता येऊ लागला आहे. याशिवाय, या देशांची निसर्गसंपन्नता, समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा भारतीयांना भुरळ घालत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
या ट्रेंडवरून स्पष्ट होते की भारतीय पर्यटक आता फक्त स्वस्त किंवा लक्झरी ठिकाणांचा विचार करत नाहीत, तर राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांनाही प्राधान्य देत आहेत. परवडणारे, नवीन आणि समृद्ध अनुभव देणारे पर्याय हेच भारतीयांच्या प्रवासयोजनेत पहिल्या क्रमांकावर येत आहेत.