China got frustated over India and Maldives Relations
बिजिंग : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. मात्र या दौऱ्याने चीनची अस्वस्थता वाढवली आहे. पंतप्रधान मोदी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या आमंत्रणावरुन मालदीवच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांना मालदीवच्या ६० व्या हरित स्वातंत्र्यदिनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी पंतप्रधान मोदीं समारंभासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी यांनी मालदीव आणि भारताच्या हिंद महासागरातील शांततेसाठी, समृद्धीसाठी आणि स्थिरतेसाठी दोन्ही देशांच्या भागीदारीला आणखी मजबूत करण्यासाठीच्या वचनाचा पुनरुच्चारही केला. तसेच भारत आणि मालदीवमध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांवरही या दौऱ्यादरम्यान चर्चा झाला. यावेळी पंतप्रधान मोदींची भव्य स्वागत करण्यात आले होते. मात्र यावर चीनच्या सरकारी माध्यमांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चीनच्या सरकारी माध्यम आउटलेट ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला आंतरराष्ट्रीय कव्हरेज मिळाल्याने यावर चीनमध्ये टीका केली जात आहे. यावरुन चीनमध्ये अस्वस्थता असल्याचे स्पष्टपण दिसून येत आहे. विशेष करुन टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या मुइज्जूचा यू-टर्न! इंडिया इन-चायना आउट या मथळ्याचा संदर्भ देत चीनच्या ग्लोबल टाईम्सने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मूइझ्झू २०२३ मध्ये मालदीवमध्ये सत्तेत आले. तेव्हापासून इंडिया आऊट मोहिमेवर त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतली होती. सुरुवातील त्यांनी टायना इन मोहिमेवर चीनकडे झुकण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अल्पावधीच भारताने मालदीवचा विश्वास संपादीत केल्याने, चीनला चांगलाच ठसका लागला आहे. मालदीव आणि भारताचे वाढते संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. अगदी पंतप्रधान मोदींच्या स्वागतावेळी देखील मुइझ्झू यांनी प्रोटोकॉल तोडून विमानताळावर गेले होते. यामुळे चीन अधिक नाराज झाला आहे.
चीनसाठी भारत आणि मालदीवचे वाढते संबंध मोठा धक्का मानले जात आहे. चीनला हे पचवणं कठी जात आहे. याच वेळी ग्लोबल टाइम्समधून मालदीव सार्वभौम राष्ट्र असल्याचे आणि विविध देशांशी संबंध ठेवणे स्वाभाविक असल्याचे म्हटले आहे. भारत आणि मालदीवचे संबंध सध्या अधिक मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परंतु या सर्व घडामोडींमुळे चीनच्या नाकाला चांगलीच मिर्ची झोंबली आहे.