फोटो सौजन्य: iStock
AI मुळे आपली अनेक काम सोपे झाले आहेत. पण AI चा शिरकाव जॉब फिल्डमध्ये सुद्धा होताना दिसत आहे. ज्याप्रमाणे AI नवीन जॉब्स निर्माण करणार, त्याचप्रमाणे यामुळे असंख्य जॉब्स जाणार देखील, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. तज्ञांचे हेच म्हणणे आता खरे होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे VerSe Innovation नावाची डिजिटल कंपनी, जी Josh आणि Dailyhunt सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सची मालक आहे. ती आता 350 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की नफा वाढवण्याच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने व्यापक Restructuring प्रक्रियेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
10 मे रोजी जारी केलेल्या निवेदनात, कंपनीने म्हटले आहे कीत्याना भविष्यातील आव्हानांसाठी अधिक सक्षम, केंद्रित आणि फ्लेक्सिबल बनवण्यासाठी ती “Strategic Transformation” करत आहे. या बदलाचे उद्दिष्ट AI मध्ये गुंतवणूक वाढवणे, कामकाज सोपे करणे आणि कंपनीची ऑपरेशन्स दीर्घकालीन उद्दिष्टांशी जुळवणे आहे.
कंपनीने मॅन्युअल प्रक्रिया स्वयंचलित करणे, ऑपरेशनल खर्च कमी करणे आणि स्ट्रक्चरल कार्यक्षमता सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही कपात केली आहे. कंपनीचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष 25 अखेरीस नफा मिळवण्याचे आहे.
VerSe च्या आर्थिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 24 मध्ये कंपनीचा महसूल 1029 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी 1104 कोटी रुपये होता. परंतु, निव्वळ तोटा 1909 कोटी रुपयांवरून 889 कोटी रुपयांवर आला आहे, ज्यामुळे तोटा कमी झाल्याचे दिसून येते. कंपनीचा EBITDA तोटा 710 कोटी रुपये होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी कंपनीने आर्थिक वर्ष 24 चा महसूल 1261 कोटी रुपये सांगितला होता, जो आता 1029 कोटी रुपये करण्यात आला आहे.
कंपनीला आर्थिक वर्ष 25 मध्ये 75 टक्क्यांहून अधिक दराने रेव्हेन्यू वाढण्याची अपेक्षा आहे, जी भारताच्या डिजिटल जाहिरात क्षेत्राच्या अंदाजे 10-15 टक्के वाढीपेक्षा खूपच जास्त आहे. ही वाढ साध्य करण्यासाठी, VerSe अनेक उपक्रमांवर काम करत आहे. जसे की NexVerse.ai, एक नवीन AI-आधारित प्लॅटफॉर्म, Dailyhunt Premium Magzter च्या सहकार्याने तयार केलेले सबस्क्रिप्शन मॉडेल आणि , VerSe Collab एक इन्फ्ल्यूएंसर कम्पेन्स व्यवस्थापित करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म.