vijay sales apple days sale attractive discounts on iphones macbooks apple watches nrvb
मुंबई : विजय सेल्स (Vijay Sales) या भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर (Electronics Retail Store) साखळीने पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांचा आवडता ॲप्पल डेज सेल (Apple Days Sale) आणला आहे, ज्यामधून ॲप्पल उत्साही व तंत्रज्ञानप्रेमींना त्यांचे विद्यमान डिवाईसेस अपग्रेड करण्याची किंवा अतुलनीय किमतींमध्ये नवीन ॲप्पल उत्पादने खरेदी करण्याची परिपूर्ण संधी मिळाली आहे. 29 एप्रिलपासून सुरू होणारा ॲप्पल डेज सेल त्यांच्या 125 हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्ये आणि विजयसेल्सडॉटकॉमवर सर्व आयफोन्स, मॅकबुक्स, ॲप्पल वॉचेस, आयपॅड्स, तसेच ॲप्पल ॲक्सेसरीज यावर सर्वोत्तम सूट देतो.
या सेलमध्ये आयफोन (iPhone) 13 फक्त 51,490 रूपयांमध्ये तर आयफोन 14 फक्त 59,990 रूपयांमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. सामान्यत: 69,900 रूपये किंमत असलेला आयफोन 13 61,490 रूपये या डील किंमतीत ऑफर (Offer) करण्यात आला आहे. तसेच HDFC बँक कार्डसवर 2000 रूपयांची कॅशबॅक देखील मिळू शकते. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमचा विद्यमान स्मार्टफोन एक्स्चेंज करायचा आहे आणि त्याची किमान एक्स्चेंज किंमत 5,000 रूपये असेल तर विजय सेल्समध्ये त्यामध्ये आणखी 3000 रूपयांची भर होईल. म्हणजेच एकूण सूट 18,410 रूपये देण्यात येईल अणि आयफोन 13 ची अंतिम किंमत फक्त 51,490 रूपये असेल.
सामान्यत: 79,900 रूपये किंमत असलेल्या आयफोन 14 साठी डील किंमत 70,990 रूपये ऑफर करण्यात आली आहे. तसेच एचडीएफसी बँक कार्डसवर 4,000 रूपयांची कॅशबॅक देखील मिळू शकते. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमचा विद्यमान स्मार्टफोन एक्स्चेंज करायचा आहे आणि त्याची किमान एक्स्चेंज किंमत 5,000 रूपये असेल तर विजय सेल्समध्ये त्यामध्ये आणखी 3,000 रूपयांची भर होईल. म्हणजेच एकूण सूट 20,910 रूपये देण्यात येईल अणि आयफोन 14 ची अंतिम किंमत फक्त 58,990 रूपये असेल.
[read_also content=”नादी लागणं सोडाच पण नाद करणं लयच अवघड आहे राव! निवृत्तीची घोषणा काय केली तर IPL पण बॅकपूटवर, गुगल आणि ट्विटरवर चर्चा फक्त आणि फक्त शरद पवारांचीच https://www.navarashtra.com/technology/sharad-pawar-trending-search-on-google-trends-and-twitter-social-media-platforms-nrvb-394227.html”]
विजय सेल्स ॲप्पल चाहत्यांना इतर आयफोन मॉडेल्स, तसेच सिरीज 8 वॉच, मॅकबुक्स, आयपॅड्स, एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन), ॲप्पल ॲक्सेसरीज आणि ॲप्पलकेअर सर्विसेसवर विशेष किंमत ऑफर करत आहे.
त्यांच्या ॲप्पल डेज मोहिमेचा भाग म्हणून ग्राहक प्रभावी किंमतीसह सर्व डिवाईसेसवर अविश्वसनीय ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात, ज्यामध्ये एचडीएफसी बँक कार्डसवर कॅशबॅक ऑफर्सचा समावेश आहे.
आयफोन 14 ची किंमत 66,990 रूपयांपासून सुरू होते; आयफोन 14 प्लसची किंमत 76,490 रूपयांपासून सुरू होते; आयफोन 14 प्रो ची किंमत 1,17,990 रूपयांपासून सुरू होते; आयफोन 14 मॅक्सची किंमत 1,28,490 रूपयांपासून सुरू होते; आयफोन व आयफोन 13 ची किंमत 59,490 रूपयांपासून सुरू होते.
आयपॅड श्रेणीमध्ये आयपॅड नाइन्थ जनरेशनची किंमत 26,490 रूपयांपासून सुरू होते, तर आयपॅड टेन्थ जनरेशनची किंमत 38,680 रूपयांपासून सुरू होते आणि आयपॅड एअर फिफ्थ जनरेशनची किंमत 52,700 रूपयांपासून सुरू होते.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 2 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-2-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
लॅपटॉप श्रेणीमध्ये एम1 चिप असलेल्या मॅकबुक एअरची किंमत 77,900 रूपयांपासून सुरू होते; एम२ चिप असलेल्या मॅकबुक एअरची किंमत 1,02,790 रूपयांपासून सुरू होते; एम2 चिप असलेल्या मॅकबुक प्रो ची किंमत 1,11,900 रूपयांपासून सुरू होते; एम2 प्रो चिप असलेल्या मॅकबुक प्रो ची किंमत 1,74,900 रूपयांपासून सुरू होते.
वॉचेस श्रेणीमध्ये ॲप्पल वॉच सिरीज 8 ची किंमत 39,990 रूपयांपासून सुरू होते; ॲप्पल वॉच एसई (सेकंड जनरेशन)ची किंमत 25,990 रूपयांपासून सुरू होते; ॲप्पल वॉच अल्ट्राची किंमत 80,390 रूपयांपासून सुरू होते. ऑडिओ श्रेणीमध्ये मॅगसेफ चार्जिंग केस असलेल्या एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) 23,490 रूपये किंमतीत उपलब्ध असेल.