
फोटो सौजन्य: Gemini
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Honda Cars India कडून वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ग्राहकांसाठी मोठ्या डिस्काउंट जाहीर करण्यात आल्या आहेत. जानेवारी 2026 दरम्यान कंपनीच्या लोकप्रिय कार्सवर लाखो रुपयांपर्यंतचे डिस्काउंट ऑफर्स दिले जात आहेत. कोणत्या Honda कारवर किती बचत करता येणार? त्याबद्दल आपण जाणून घेउयात.
HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?
Honda कडून कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये ऑफर केली जाणारी Honda Amaze या कारवर जानेवारी महिन्यात आकर्षक सवलत देण्यात येत आहे. या महिन्यात Amaze खरेदी केल्यास 54 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. Honda Amaze च्या तिसऱ्या जनरेशनची एक्स-शोरूम किंमत 7.41 लाख रुपयांपासून सुरू होते. याशिवाय, दुसऱ्या जनरेशनच्या उरलेल्या युनिट्सवर कंपनीकडून 65 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
मिड-साइज सेडान सेगमेंटमधील लोकप्रिय कार Honda City वरही जानेवारी 2026 मध्ये खास डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्यात Honda City खरेदी केल्यास कमाल 1.33 लाख रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते.
याशिवाय, Honda City e:HEV (हायब्रिड व्हर्जन) वर कंपनीकडून 7 वर्षांच्या एक्सटेंडेड वॉरंटीवर 17 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. Honda City ची एक्स-शोरूम किंमत 11.95 लाख रुपयांपासून, तर तिच्या हायब्रिड व्हर्जनची किंमत 19.48 लाख रुपयांपासून सुरू होते.
Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
Honda कडून मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये ऑफर केली जाणारी Honda Elevate ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जानेवारी 2026 हा तुमच्यासाठी योग्य काळ ठरू शकतो. कंपनीकडून 2026 मध्ये तयार झालेल्या युनिट्सवर कमाल 1.37 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. तर 2025 मॉडेल युनिट्सवर तब्बल 1.71 लाख रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी उपलब्ध आहे. Honda Elevate ची एक्स-शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते.