'या' शेअरमध्ये 56 दिवसांत 56 टक्के घसरण; थेट 7 रुपयांवर घसरलाय स्टॉक, तुम्ही तर घेतला नाहीये ना?
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी पडझड पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान देखील होत आहे. अशातच एका शेअरमध्ये गेल्या 56 ट्रेडिंग सेशनमध्ये 56 टक्क्यांची घसरण झाली आहे. याच पार्श्वभुमीवर आज आपण संबंधित शेअरबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच या शेअरची पुढील वाटचाल कशी राहिल. याबाबत माहिती समजून घेणार आहोत.
शेअरमध्ये 56 दिवसांत 56 टक्के घसरण
भारतातील टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये गेल्या 56 ट्रेडिंग सेशनमध्ये तब्बल 56 टक्के घसरण झाली आहे. 29 ऑगस्ट रोजी 16.3 रुपये प्रति शेअर या किमतीवर बंद झालेल्या शेअरमध्ये 56.4 टक्क्यांची मोठी घसरण पहायला मिळत आहे. गेल्या मंगळवारी (19 नोव्हेंबर) या शेअरची किंमत 7.10 रुपयांवर पोहोचली होती. गेल्या पाच दिवसांत शेअरमध्ये 6 टक्के आणि महिन्याभरात 20 टक्क्यांची घसरण झाली आहे.
हे देखील वाचा – शेअर बाजार सावरला… सेन्सेक्सची 1900 अंकाने उसळी; निफ्टी 23900 अंकांच्या पार!
कंपनीने अपेक्षेपेक्षा अधिक युजर्स गमावले
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, वोडाफोन आयडियाचे Q2 FY25 सरासरी उत्पन्न तिमाही-दर-तिमाही 7.8 टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, कंपनीने अपेक्षेपेक्षा अधिक युजर्स गमावले आहेत. यामध्ये 4जी नेटवर्कच्या विस्तारानंतरही याध्ये 2 मिलियन डेटा समाविष्ट आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की, संकटात असलेल्या वोडाफोन आयडिया कंपनीने आपले युजर्स वाढवण्याची योजना आखण्यास सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा – पेटीएमचा शेअर निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी; किंमत 1000 रुपयांपर्यंत जाणार?
बँक गँरंटी माफ आणि एजीआर रिझॉलुशनसाठी सरकारसोबत बोलणे करत आहे. तसेच कर्ज वित्तपुरवठ्यावर काम करत आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने सांगितले की, सरकारची देय रकमेसाठी रोखीची कमतरता इक्विटीमध्ये बदलली जाणे अपेक्षित आहे. ब्रोकरेजने FY25-27 साठी वोडाफोन आयडियाच्या EBITDA अंदजात 2-6 टक्क्यांनी कपात केली आहे.
हे देखील वाचा – वेळेआधीच एफडी मोडल्यावर भरावा लागेल दंड; वाचा… कोणती बॅंक किती शुल्क आकारते?
वोडाफोन आयडिया शेअर प्राईस टार्गेट
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने वोडाफोन आयडियावर होल्ड रेटिंग कायम ठेवली आहे. टार्गेट प्राईस 11 रुपयांवरुन कमी करुन 7 रुपये प्रति शेअर केली आहे. बीएसई अॅनालिटिक्सच्या मते, वोडाफोनच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 20 टक्क्यांनी, गेल्या तीन महिन्यात 55 टक्के आणि 2024 मध्ये आतापर्यंत 58 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)