शेअर बाजार सावरला... सेन्सेक्सची 1900 अंकाने उसळी; निफ्टी 23900 अंकांच्या पार!
मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे नोव्हेंबर सीरिजच्या एक्सपायरी दिवशी शेअर बाजार चांगल्या पातळीवर बंद झाला आहे. बँकिंग, आयटी आणि रिअल इस्टेटसह सर्व क्षेत्रीय निर्देशांकात वाढ होऊन बाजार बंद झाला आहे. बँक निफ्टी 763 अंकांनी वाढून, 51135 च्या पातळीवर बंद झाला आहे. निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये व्यापार वाढीसह बंद झाला आहे. परंतु, मीडिया क्षेत्र हे असे एक क्षेत्र आहे. जे घसरणीसह बंद होत आहे.
आज काय घडले बाजारात?
आज मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) निर्देशांक 1961.32 अंकांच्या किंवा 2.54 टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह 79,117 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 557.35 अंकांच्या किंवा 2.39 टक्क्यांच्या उसळीसह 23,907 वर बंद होताना दिसून आला आहे.
हे देखील वाचा – पेटीएमचा शेअर निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी; किंमत 1000 रुपयांपर्यंत जाणार?
‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
सेन्सेक्समधील 30 पैकी 30 शेअर्स हे हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसून आले आहे. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ झालेल्यांमध्ये एसबीआय, टीसीएस, टायटन, आयटीसी, इन्फोसिस, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.
कशी राहिली निफ्टीच्या शेअर्सची कामगिरी?
50 निफ्टी समभागांपैकी 49 शेअर्स वधारताना दिसत आले आहेत. केवळ 1 शेअर घसरणीसह व्यवहार करताना दिसून आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात केवळ बजाज ऑटोचा शेअर घसरणीच्या लाल चिन्हात बंद झाला आहे. इतर सर्व शेअर्स वाढीसह व्यवहार करताना दिसून आले. एसबीआय, बजाज फायनान्स, आयटीसी, टीसीएस आणि टायटन या कंपन्यांची नावे सर्वातवर आहेत.
हे देखील वाचा – वेळेआधीच एफडी मोडल्यावर भरावा लागेल दंड; वाचा… कोणती बॅंक किती शुल्क आकारते?
किती आहे बीएसईचे मार्केट कॅप
जर आपण बीएसईच्या मार्केट कॅपवर नजर टाकली तर ती 432.70 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यासह आज 7.41 लाख कोटी रुपयांची मोठी झेप नोंदवली गेली आहे. यामध्ये 4041 शेअर्सवर ट्रेडिंग बंद झाली. तर 2446 शेअर्समध्ये वाढ झाली आहे. 1475 शेअर्समध्ये घसरण झाली आणि 120 शेअर्सच्या घसरणीसह व्यवहार बंद झाला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)