Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह ‘या’ शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Update: मंगळवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही शेअर्सची शिफारस देखील केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2026 | 10:09 AM
Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह 'या' शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह 'या' शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बाजारात तेजीचे वातावरण
  • सपाट पातळीवर होणार भारतीय शेअर बाजाराची सुरुवात
  • गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी केली आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस
India Share Market Update: बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी जागतिक बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र असे असले तरी देखील आज भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,७६२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २३ अंकांनी जास्त होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात घसरण सुरुच! आजचे दर पाहून ग्राहक झाले आनंदी, वाचा सविस्तर

मंगळवारी, भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजी पाहायला मिळाली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,७०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स १७३.८१ अंकांनी म्हणजेच ०.२१% ने वाढून ८३,४५०.९६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४२.६५ अंकांनी म्हणजेच ०.१७% ने वाढून २५,७२५.४० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक २२४.९० अंकांनी किंवा ०.३७% ने वाढून ६१,१७४.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या गुंतवणूकदारांनी जर भारती एअरटेल, इटरनल, इन्फोसिस, भेल, अदानी एंटरप्रायझेस, दिलीप बिल्डकॉन, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, इंजिनियर्स इंडिया, एनडीएल व्हेंचर्स, हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत केले, तर त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी शिफासर केलेल्या या इंट्राडे स्टॉक्समध्ये सन टीव्ही, सफायर फूड्स इंडिया, बीपीसीएल, फोर्टिस हेल्थकेअर, प्रेस्टिज इस्टेट्स, टाटा मोटर्स पीव्ही, पेटीएम आणि डीसीएक्स सिस्टम्स यांचा समावेश आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि डेरिव्हेटिव्ह्ज आणि क्वांट रिसर्च प्रमुख जय ठक्कर यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी युनियन बँक फ्युचर्स, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस फ्युचर्स (एमएफएसएल) आणि कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) फ्युचर्स या स्टॉक्सची शिफारस केली आहे. नुवामा प्रोफेशनल क्लायंट्स ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष-संशोधन सागर दोशी यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी) आणि एनएलसी इंडिया लिमिटेड या तीन स्टॉकची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Investors can buy this stocks today including bharti airtel and eternal read experts advice tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?
1

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?
2

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
3

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
4

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.