Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आज बाजारात तेजी की मंदी? ट्रेडर्ससाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Update: शेअर बाजारात आज नाकारात्मक म्हणजेच लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कोणते शेअर्स खरेदी करू शकतात, याबाबबत देखील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2026 | 08:30 AM
Stock Market Today: आज बाजारात तेजी की मंदी? ट्रेडर्ससाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Stock Market Today: आज बाजारात तेजी की मंदी? ट्रेडर्ससाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजारात आज कमकुवत सुरुवात
  • शेअर बाजारातील तज्ज्ञांनी केली या शेअर्सची शिफारस
  • गुरुवारी शेअर बाजार तेजीत
India Share Market Update:  शेअर बाजारात गुरुवारी २९ जानेवारी तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. तसेच काही शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आज ३० जानेवारी रोजी, जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंद किंवा सपाट पातळीवर उघडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,४३५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १०१ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: सोनं लवकरच पार करणार 2 लाख रुपयांचा टप्पा, चांदीही गगनाला भिडली

गुरुवारी, भारतीय शेअर बाजाराने तेजीचा सपाटा लावला आणि सलग तिसऱ्या सत्रात त्याची तेजी वाढली, बेंचमार्क निफ्टी ५० ने २५,४०० ची पातळी पुन्हा मिळवली. सेन्सेक्स २२१.६ ९ अंकांनी म्हणजेच ०.२७% ने वाढून ८२,५६६.३७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ७६.१५ अंकांनी म्हणजेच ०.३०% ने वाढून २५,४१८.९० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ३५९.०५ अंकांनी किंवा ०.६०% ने वाढून ५९,९५७.८५ वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार मीशो, एनटीपीसी, नेस्ले, बजाज ऑटो, टाटा इन्व्हेस्टमेंट, पॉवर ग्रिड, पेटीएम, आयटीसी, टाटा मोटर्स, वेदांत, स्विगी, डिक्सन टेक्नॉलॉजीज, डाबर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान एरोनॉटिक्स या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकणार आहेत. आजच्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना सावध भुमिका बाळगावी लागणार आहे. तसेच आगमी बजेटचा परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Union Budget Red Bag History:  बजेट बॅगचा रंग लालच का? काय आहे या मागची खरी कहाणी; जाणून घ्या एका क्लिकवर 

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठीचे तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधरचे तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी एमसीएक्स, करूर वैश्य बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बीएसई, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प, संवर्धन मदरसन आणि टोरेंट पॉवर या आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: What to expect from share market today at 30 january 2026 indian share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
1

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
2

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
3

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.