
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल, JSW ग्रुपचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल, तसेच Paytm चे CEO श्री विजय शेखर शर्मा हे 2025 फोरमसाठी पुष्टी झालेल्या प्रमुख वक्त्यांमध्ये आहेत.महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि ओडिशाचे मुख्यमंत्री तसेच भारतातील अनेक अग्रगण्य उद्योगपती यांना देखील निमंत्रणे देण्यात आली आहेत. देशाच्या उद्योजकीय व आर्थिक परिसंस्थेला बळकटी देण्यावर या चर्चांमध्ये भर दिला जाणार आहे.हे मुंबई फोरम नुकत्याच संपन्न झालेल्या WHEF 2025 अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) परिषदेनंतर आयोजित केले जात आहे.
‘एम्पॉवरिंग ग्रोथ: प्रॉस्पेरिटी, इनोव्हेशन अॅन्ड सस्टेनेबिलिटी’ या थीमखाली झालेल्या अॅडलेड फोरममध्ये ऑस्ट्रेलियाचे व्यापार व गुंतवणूक मंत्री जो सझाक्स, पर्यटन व बहुसांस्कृतिक व्यवहार मंत्री झो बेटिसन, तसेच सेनेटर अँड्र्यू मॅकलॅन यांच्या सहभागाने WHEF चा वाढता जागतिक प्रभाव आणि भारत–ऑस्ट्रेलिया हिंदू डायस्पोरा भागीदारी अधोरेखित झाली.
WHEF चे प्रवर्तक स्वामी विज्ञानानंद म्हणाले,“आपली अर्थव्यवस्था हीच आपली ताकद आहे. WHEF च्या माध्यमातून जागतिक हिंदू समाजातील प्रतिभा, ज्ञान आणि उद्योजकतेची एकत्रित शक्ती वापरून अधिकाधिक संपत्ती निर्माण करणे आणि ती सर्वांसोबत वाटणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जगातील आर्थिक समीकरणे बदलत असताना, नवोपक्रम, नैतिक उद्योजकता आणि स्वावलंबन यांच्या बळावर भारताने पुढे नेतृत्व करावे.”
WHEF 2025 आयोजन समितीचे अध्यक्ष आणि कॅप्रि ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे MD व CEO राजेश शर्मा म्हणाले,“वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम हे मूल्याधिष्ठित विकास आणि उद्योजकतेचा उत्सव साजरा करणारे जागतिक व्यासपीठ बनले आहे. WHEF 2025 मध्ये नवोपक्रम, नीतिमत्ता आणि सहकार्य भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतील भूमिका कशी बदलू शकतात यावर प्रकाश टाकला जाईल. आमचे ध्येय आहे. कल्पनांना भांडवलाशी जोडणे, परंपरेला तंत्रज्ञानाशी जोडणे आणि स्थानिक उद्योजकतेला जागतिक संधींशी जोडणे.”
दोन दिवसीय फोरमचा पहिला दिवस (19 डिसेंबर) मोठ्या कॉर्पोरेट्ससाठी विशेष सत्राने सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी (20 डिसेंबर) MSME आणि उद्योजकीय सत्र आयोजित केले जाईल. WHEF Launchpad सादरीकरणे, धोरणसंवादी सत्रे आणि विस्तृत नेटवर्किंग संधी हे या फोरमचे मुख्य आकर्षण राहील. तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, आणि सामाजिक नवोपक्रम अशा विविध क्षेत्रांतील 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
हे मुंबई फोरम WHEF 2024 च्या यशावर आधारित आहे. 13 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान मुंबईत झालेल्या 2024 फोरममध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, गुजरातचे भूपेंद्र पटेल, आणि गोव्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभाग नोंदवला होता. 60 हून अधिक देशांतील 1,000 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या परिषदेत हजेरी लावली होती.
2024 च्या परिषदेत उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, टिकाऊ उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि जागतिक स्टार्टअप इकोसिस्टमवरील सुमारे वीस विषयक सत्रे पार पडली. WHEF Launchpad हे स्टार्टअप्ससाठी गुंतवणूकदार आणि व्यावसायिक मार्गदर्शकांशी जोडणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून विशेष ठरले.
2012 मध्ये स्थापन झालेल्या WHEF ने हाँगकाँग, लंडन, लॉस एंजेलिस, बँकॉक, शिकागो आणि अॅडलेड येथे यशस्वी फोरमचे आयोजन केले आहे. यामध्ये स्मृती निर्मला सीतारामन, डॉ. विवेक देबरॉय,अजय पीरामल, के. व्ही. कामत,मोहंदास पै, श्रीधर वेम्बू, निलेश शाह, नवनीत मुनोत, आणि जी. एम. राव यांसारख्या दिग्गजांनी सहभाग घेतला आहे.
आर्थिक सामर्थ्य हीच खरी शक्ती, आणि नैतिक, समाजकेंद्रित आर्थिक विकासातूनच शाश्वत समृद्धी मिळते. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम (WHEF) बद्दल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम हे जगभरातील यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. नवोपक्रम, सहकार्य आणि धर्माधिष्ठित मूल्यांच्या आधारे उद्योजकता प्रोत्साहन, संपत्ती निर्मिती आणि समाजसमृद्धी हे WHEF चे ध्येय आहे.
Ans: WHEF 2025 चे आयोजन 19–20 डिसेंबर 2025 रोजी ग्रँड हयात, मुंबई, महाराष्ट्र येथे होणार आहे.
Ans: 2025 ची थीम आहे — नवोपक्रम, स्वावलंबन आणि समृद्धी.
Ans: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत.