Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांना मोठा दिलासा! ४८ तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास ‘नो चार्ज’; DGCA कडून नियमांत बदल

नव्या नियमांनुसार, तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांच्या आत ते रद्द केल्यास प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे प्रवाशांची मोठ्या आर्थिक भुर्दंडापासून सुटका होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 26, 2026 | 08:34 PM
विमान प्रवाशांना मोठा दिलासा (Photo Credit- X)

विमान प्रवाशांना मोठा दिलासा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • विमान प्रवाशांना मोठा दिलासा!
  • ४८ तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास ‘नो चार्ज’
  • DGCA कडून नियमांत बदल
New Air Ticket Refund Rules: विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नागरी विमानन संचालनालयाने (DGCA) एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. विमान तिकीट रद्द करण्याच्या (Ticket Cancellation) नियमांमध्ये मोठे बदल करत DGCA ने आता विमान कंपन्यांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमांनुसार, तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांच्या आत ते रद्द केल्यास प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे प्रवाशांची मोठ्या आर्थिक भुर्दंडापासून सुटका होणार आहे.

नेमका नवा नियम काय?

DGCA ने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार, प्रवाशांना आता ‘लुक-इन’ (Look-in Period) सुविधेचा लाभ घेता येणार आहे. तिकीट बुक केल्यापासून ४८ तासांच्या कालावधीत प्रवाशांना तिकीट रद्द करणे किंवा त्यात बदल करणे विनाशुल्क शक्य होईल. मात्र, जर प्रवाशाला त्याच तिकिटावर प्रवासाची तारीख बदलायची असेल, तर नवीन विमान फेरीसाठी असणाऱ्या सामान्य भाड्याचा फरक द्यावा लागेल. याव्यतिरिक्त, तिकीट बुक केल्यानंतर २४ तासांच्या आत प्रवाशाच्या नावातील चूक सुधारण्यासाठी विमान कंपन्यांना कोणतेही शुल्क घेता येणार नाही. मात्र, ही सुविधा केवळ एअरलाईन्सच्या अधिकृत वेबसाइटवरून घेतलेल्या तिकिटांसाठीच लागू असेल. ही सुविधा देशांतर्गत प्रवासासाठी ७ दिवस आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी १५ दिवस आधी बुक केलेल्या विमानांसाठीच लागू असेल. प्रवासाच्या तारखेला अत्यंत कमी कालावधी शिल्लक असताना हे नियम लागू होणार नाहीत.

Air Travel Expensive : नवी मुंबई ते दिल्ली तिकीटाचे दर 15000 रुपये, सलग सुट्ट्यांमुळे हवाई प्रवास महागला

रिफंडची प्रक्रिया आणि ट्रॅव्हल एजंटची जबाबदारी

अनेकदा ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलवरून तिकीट बुक केल्यास रिफंड मिळवण्यासाठी प्रवाशांना अडचणी येतात. यावर तोडगा काढताना DGCA ने स्पष्ट केले आहे की, रिफंडची पूर्ण जबाबदारी संबंधित विमान कंपनीची असेल, कारण एजंट हे त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आहेत.

  • वेळापत्रक: सर्व रिफंड प्रक्रिया १४ कामकाजाच्या दिवसांच्या (Working Days) आत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  • पेमेंट मोड: क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरले असल्यास ७ दिवसांत आणि रोख स्वरूपात पैसे भरले असल्यास तात्काळ रिफंड देणे अनिवार्य आहे.
  • मेडिकल इमर्जन्सी: वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा किंवा ‘क्रेडिट शेल’ची (पुढील प्रवासासाठी वापरता येणारी रक्कम) व्यवस्था करावी लागेल.

पारदर्शकता आणि तक्रार निवारण

विमान कंपन्यांनी बुकिंग करतानाच प्रवाशांना कॅन्सलेशन चार्जेसची स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. नागरी विमानन मंत्रालयाकडे प्रवाशांच्या तक्रारींचा ओघ वाढल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. विमान कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर रिफंड पॉलिसी स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे हवाई प्रवास अधिक विश्वासार्ह आणि ग्राहकस्नेही होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

PM Narendra Modi : भारत आणि इस्रायलमध्ये होणार मोठा करार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परदेशातून मोठी घोषणा

Web Title: Big relief for air passengers no charge if ticket is cancelled within 48 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • air travel
  • Business News
  • Online Ticket

संबंधित बातम्या

National Entrepreneurship Networkच्या अध्यक्षपदी मनीष दलाल; AI, SaaS आणि Cloud क्षेत्रातील 25 वर्षांच्या अनुभवाचा फायदा
1

National Entrepreneurship Networkच्या अध्यक्षपदी मनीष दलाल; AI, SaaS आणि Cloud क्षेत्रातील 25 वर्षांच्या अनुभवाचा फायदा

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
2

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन
3

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन

LPG Connection New Rule: कधीपासून मिळणार एलपजी सिलेंडरचे नवे कनेक्शन, सरकारने दिली अपडेट
4

LPG Connection New Rule: कधीपासून मिळणार एलपजी सिलेंडरचे नवे कनेक्शन, सरकारने दिली अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.