
Share Market Today: नकारात्मक पातळीवर होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, गुंतवणूक करताना सावध राहा!
Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावाने पुन्हा घेतली उंच भरारी! ग्राहकांचे बजेट कोलमडले
गुरुवारी, भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला, निफ्टी ५० २६,२०० च्या पातळीजवळ बंद झाला. सेन्सेक्स ४४६.२१ अंकांनी म्हणजेच ०.५२% ने वाढून ८५,६३२.६८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १३९.५० अंकांनी म्हणजेच ०.५४% ने वाढून २६,१९२.१५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी १३१.६५ अंकांनी किंवा ०.२२% ने वाढून ५९,३४७.७० वर बंद झाला. मात्र आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजारात घसरण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज तीन स्टॉकची शिफारस केली आहे, ज्यावर गुंतवणूकदार फोकस करू शकतात. चंदन टपारिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज , एचडीएफसी बँक आणि टाटा कम्युनिकेशन्स या शेअर्सचा समावेश आहे.
प्रभुदास लिल्लाधर येथील टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांच्या मते आज गुंतवणूकदारांनी हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी (HOEC), सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च आणि CAMS या तीन स्टॉक्सवर फोकस करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. रेलिगेअर ब्रोकिंग येथील संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी पुढील एक ते दोन आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स आणि मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस हे तीन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कारण या शेअर्समध्ये अनुकूल तांत्रिक व्यवस्था दिसते, असं त्यांच मत आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स, अनुपम रसायन इंडिया, आझाद इंजिनिअरिंग, सेनोरेस फार्मास्युटिकल्स आणि पीडीएस यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीज, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, JSW एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, नेस्ले इंडिया, ३६० वन डब्ल्यूएएम, अल्केम लॅबोरेटरीज, झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) या बाजारातील तज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड, एमटीएआर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेड (आयईएक्स), कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (कॉनकोर), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), वारी एनर्जीज लिमिटेड, आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि रॅम्को इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.