फोटो सौजन्य: iStock
मृत्यूबद्दल बोलणे बहुतेकांना अवघड जाते. परंतु घरातील मुख्य कमावता व्यक्ती म्हणून एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तो प्रश्न म्हणजे “माझ्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या काय करायचे हे माहीत असेल का?” दुर्दैवाने, अनेक भारतीय कुटुंबांचे उत्तर ‘नाही’ असेच असते. त्यामुळे भावनिक आघातानंतर आर्थिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढते.
गुंतवणूक कुठे आहे? कर्जाची स्थिती काय आहे? इन्श्युरन्स आहे का? दावे कसे करायचे? भविष्यातील खर्च कसे भागवायचे? या प्रश्नांची उत्तरे कुटुंबियांना माहीत नसतील तर आर्थिक संकट ओढवू शकते. अनेक वेळा कागदपत्रे, बँक खात्यांचा तपशील आणि विम्याची माहिती नसल्याने महिने महिने सरकारी कार्यालये, बँका आणि दाव्यांच्या प्रक्रियेत विलंब होतो.
अनुप सेठ यांच्या मते, अशा परिस्थितीसाठी आधीच तयारी करणे हे नकारात्मक नाही, तर जबाबदारीचे वर्तन आहे. कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील सहा गोष्टी अत्यावश्यक आहेत:
एक गडबड आणि Toyota च्या ‘या’ कारचे हजारो युनिट्स बोलावले परत, नेमकं झालं काय?
१) इच्छापत्र तयार करा व नॉमिनेशन्स नेहमी अपडेटेड ठेवा
संपत्तीचा वारस कोण, याविषयीची अस्पष्टता दूर करा. बँक खाती, पीएफ, विमा, लॉकर अशा सर्व गोष्टींची नॉमिनेशन अपडेट असावी. इच्छापत्र सुरक्षित ठिकाणी व विश्वस्त व्यक्तीकडे ठेवावे.
२) महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी ठेवा
पॅन, आधार, प्रॉपर्टी पेपर्स, लोन एग्रीमेंट, विमा पॉलिसी, इच्छापत्र अशा सर्व कागदपत्रांची फिजिकल आणि डिजिटल प्रत ठेवा आणि त्यांचा ॲक्सेस कुटुंबियांना कळवा.
३) सर्व मालमत्ता आणि दायित्वांची यादी तयार ठेवा
बँक बॅलन्स, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, प्रॉपर्टी, डिजिटल ॲसेट्स आणि कर्जाची माहिती लेटेस्ट ठेवा. देणी असल्यास तुमच्या अनुपस्थितीत परतफेडीचे नियोजन करा.
Cash चे टेन्शन खल्लास! FD तोडल्याशिवाय मिळवा पैसे, ओव्हरड्राफ्टचा उत्तम पर्याय
४) क्लेम करण्याच्या स्टेप-बाय-स्टेप सूचना लिहून ठेवा
आर्थिक साक्षरतेनंतरही क्लेम प्रक्रिया गुंतागुंतीची असते. त्यामुळे प्रत्येक विमा किंवा गुंतवणुकीसाठी सोप्या भाषेत सूचना लिहा. जसे की कंपनीचा संपर्क, आवश्यक कागदपत्रे, पॉलिसी तपशील इत्यादी.
५) मुलांच्या किंवा अवलंबित व्यक्तींच्या पालकत्वाचा निर्णय ठरवा
अल्पवयीन किंवा विशेष गरज असलेल्या व्यक्तींसाठी इच्छापत्रात योग्य पालकाचे नाव नमूद करणे अत्यावश्यक आहे.
६) दोन-तीन वर्षांनी योजनेचे पुनर्मूल्यांकन करा
लग्न, मुलांचा जन्म, संपत्तीची खरेदी-विक्री, घटस्फोट अशा जीवनातील बदलांनुसार इच्छापत्र व आर्थिक नियोजन अद्ययावत ठेवा.
अनुप सेठ यांचे मत आहे की, कुटुंबाला आर्थिक माहिती न दिल्यास विसंगती, विलंब आणि आर्थिक नुकसानाचा धोका वाढतो. त्यामुळे आर्थिक संपत्तीइतकीच महत्त्वाची आहे स्पष्ट माहिती आणि निश्चितता.






