Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? व्यवहार करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Update: शेअर बाजारात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार? आज कोणते गुंतवणूकदारांना मालामाल करणार? तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदांना व्यवहार करण्यासाठी कोणता सल्ला दिला आहे, जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2026 | 08:31 AM
Stock Market Today: कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? व्यवहार करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? व्यवहार करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • तज्ज्ञांचा इशारा! एप्रिलच्या पहिल्या दिवशी बाजारात व्यवहार करताना ‘हा’ सल्ला लक्षात ठेवा
  • आज बाजार उघडताच कुठे गुंतवणूक कराल? तज्ज्ञांनी दिला खास मंत्र
  • शेअर बाजारात आजचा गेमचेंजर कोण? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती
India Share Market Update:  गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले अमेरिका आणि ईराण यांच्यामधील युद्ध लवकरच संपणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक संकेत पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३५३ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २२,७७९ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: एप्रिलच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदी महागलं! ग्राहकांना बसला मोठा धक्का

महावीर जयंतीनिमित्त मंगळवार, ३१ मार्च रोजी भारतीय शेअर बाजार सुट्टीमुळे बंद होता. सोमवारी भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २२,४०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स १,६३५.६७ अंकांनी, म्हणजेच २.२२ टक्क्यांनी घसरून ७१ , ९४७.५५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४८८.२० अंकांनी, म्हणजेच २.१४ टक्क्यांनी घसरून २२,३३१.४० वर स्थिरावला.सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक १,९९९.२५ अंकांनी, म्हणजेच ३.८२ टक्क्यांनी घसरून ५०,२७५.३५ अंकांवर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज 1 एप्रिल रोजी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया दिलेल्या सल्ल्यानुसार, गुंतवणूकदार ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स, इप्का लॅबोरेटरीज, आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया, सामना कॅपिटल आणि केएसबी हे शेअर्स खरेदी करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज खरेदीसाठी दोन स्टॉक्स आणि विक्रीसाठी एका स्टॉकची शिफारस केली आहे. तापारिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ( ONGC ) हे शेअर्स खरेदी करू शकतात. दुसरीकडे, त्यांनी युनायटेड स्पिरिट्सच्या स्टॉक फ्युचर्सची विक्री करण्याची शिफारस केली आहे.

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या बाजार तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी चार स्टॉक्सची शिफारस केली आहे. बाजारातील तज्ज्ञांनी शिफारस केल्यानुसार आज गुंतवणूकदार अर्बन कंपनी, सेल (SAIL), टेक महिंद्रा आणि कोल इंडिया हे शेअर्स खरेदी करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Which stocks can deliver strong returns on the first trading day of april expert advice for investors stock market marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
1

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला
2

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर
4

Share Market Outlook : पुढच्या आठवड्यात शेअर बाजार काय वळण घेणार? ‘या’ घटकांवर ठेवा बारीक नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.