Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या 22 व्या वर्षी 21000 कोटींचा उद्योग घेतला हाती, कोण आहे आनंदमयी बजाज?

Anandamayi Bajaj: नवीन महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारताना आनंदमयी म्हणाली, "बजाज समूहाशी औपचारिकरित्या जोडले जाणे ही माझ्यासाठी मोठा अभिमानाची गोष्ट आहे. मला शिकण्यास, वाढण्यास आणि समूहाच्या परंपरा पुढे नेण्यास उत्साह आहे.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Aug 11, 2025 | 07:02 PM
अवघ्या 22 व्या वर्षी 21000 कोटींचा उद्योग घेतला हाती, कोण आहे आनंदमयी बजाज? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

अवघ्या 22 व्या वर्षी 21000 कोटींचा उद्योग घेतला हाती, कोण आहे आनंदमयी बजाज? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Anandamayi Bajaj Marathi News: बजाज समूहाने त्यांच्या संस्थापक जमनालाल बजाज यांची पाचवी पिढी असलेल्या आनंदमयी बजाज यांच्या समूहात सामील होण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. भारतामधील साखर, इथेनॉल, वीज आणि ग्राहक उत्पादनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या या नामवंत समूहाचे अध्यक्ष कुशाग्र नयन बजाज यांची मुलगी आनंदमयी बजाज या बजाज समूहाच्या पहिल्या महिला उत्तराधिकारी ठरली आहे. ती आता नेतृत्व भूमिकेत सक्रिय सहभागी होणार असून, समूहाच्या पुढील वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

आनंदमयी बजाजने न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठामधून Financial Economics आणि गणित या विषयांत पदवी मिळवून आपल्या शैक्षणिक यशात भर घातली आहे. तीव्र बौद्धिक क्षमता, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आणि कौटुंबिक वारशाप्रती असलेली खोल बांधिलकी यासह, आनंदमयी बजाज समूहात नव्या उर्जेसह आणि नव्या दृष्टिकोनासह बजाज समूहात सहभागी होत आहे.

New Income Tax Bill: सर्वसामान्य नागरिकांवर होणार परिणाम? नवीन आयकर विधेयक लोकसभेत मंजूर! नवीन कायद्यात काय? जाणून घ्या

केवळ २२ वर्षांच्या वयात ती बजाज एनर्जी, बजाज कन्झ्युमर आणि बजाज हिंदुस्तान शुगर या प्रमुख कंपन्यांच्या नेतृत्व पथकाबरोबर कार्य करेल आणि मुंबई येथील मुख्यालयातून आपली पूर्णवेळ जबाबदारी पार पाडणार आहे. स्वतःच्या भूमिकेची सुरुवात करताना विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये क्रॉस-फंक्शनल प्रशिक्षण घेऊन २०२५ च्या अखेरीपर्यंत मुख्य ऑपरेशनल जबाबदाऱ्या पार पाडण्यास सज्ज होण्याचा तिचा मानस आहे.

काय म्हणले कुशाग्र बजाज?

या महत्त्वपूर्ण क्षणी, कुशाग्र नयन बजाज यांनी एका भावनिक संदेशात म्हटले, “आनंदमयीचे पालनपोषण आमच्या मूल्यांशी आणि वारशाशी घट्ट जोडलेले आहे. ती नव्या विचारांसह, सखोल समजूतदारपणा आणि जमिनीशी जोडलेली जबाबदारी घेऊन येत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ती समूहाला नव्या उंचीवर नेण्यास पूर्णपणे सक्षम आहे.”

नव्या भूमिकेबद्दल आनंदमयी बजाज काय म्हणाली?

नवीन महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारताना आनंदमयी म्हणाली, “बजाज समूहाशी औपचारिकरित्या जोडले जाणे ही माझ्यासाठी मोठा अभिमानाची गोष्ट आहे. मला शिकण्यास, वाढण्यास आणि समूहाच्या परंपरा पुढे नेण्यास खूप उत्साह आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे, आणि मी ती संपूर्ण समर्पणाने पार पाडीन.“

बजाज समूहाबद्दल

बजाज समूह आज $2.5 अब्ज डॉलर्स मूल्याच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेला एक प्रमुख भारतीय उद्योगसमूह आहे. जे साखर, इथेनॉल, वीज आणि एफएमसीजी अशा क्षेत्रांमध्ये काम करते. समूहाकडे $5 अब्ज डॉलर्सहून अधिकचे मालमत्ता आधार असून, त्यामध्ये १२,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.  २००८ मध्ये ते मूळ बजाज ग्रुपपासून वेगळे झाले. १९३० मध्ये जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेला मूळ बजाज ग्रुप कुशाग्र यांचे चुलत भाऊ राजीव बजाज (बजाज ऑटोचे एमडी) आणि संजीव बजाज (बजाज फिनसर्व्हचे सीएमडी) यांच्याद्वारे चालवला जातो.

राजीव यांचा मुलगा ऋषभ हा बजाज ऑटोमध्ये डिव्हिजनल मॅनेजर (प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी) म्हणून काम करतो, तर संजीव यांची मुलगी संजली बजाज फिनसर्व्हमध्ये काम केल्यानंतर सध्या हार्वर्डमधून एमबीए करत आहे. आनंदमयीच्या आगमनानंतर बजाज समूह नव्या विचारसरणीकडे, नव्या उर्जेकडे आणि नव्या दिशेकडे वाटचाल करताना दिसत आहे.

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक

Web Title: Who is anandmayi bajaj who took up a business worth rs 21000 crore at the age of just 22

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 07:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.