Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?

सध्या सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बदलत्या किमतीचा परिणाम आता भारतीयांवर होताना दिसत आहे. सोन्याचे दर निचांक गाठत असताना लोकं जुने सोन्याचे दागिनी विकत असल्याचं चित्र दिसत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 30, 2026 | 12:33 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

सोनं भारतीयांसाठी जीवाभावाचा विषय आहे. जरा तो अलंकार म्हणून आवडीने जोपासला जातो तसंच त्याच्याकडे गुंतवणूक म्हणूनही तितकंच महत्त्व देतात. पण सध्याची परिस्थिती काही वेगळीच दिसत आहे. जागतिक उलथापालथ आणि त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर वेळोवेळी दिसून आला आहे. आताही बाजाराने वेगळंच वळण घेतलं आहे. सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून झपाट्याने घसरत असल्याने, अनेक भारतीय कुटुंबे आपले जुने दागिने विकण्याकडे वळले आहेत. पण नेमकं का? लोकांच्या मनात नेमकी कोणती अशी भीती वाटत आहे.

Share Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! आज ‘या’ 7 स्टॉक्समध्ये मिळू शकते कमाईची संधी

शुक्रवारी सकाळी, MCX वर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१,४४,१९९ होता, जो त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा खूपच कमी आला आहे. परिणामी, अनेक ग्राहक आपले जुने दागिने नवीन दागिन्यांच्या बदल्यात देण्याऐवजी ते थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या IBJA मते, एप्रिल-जून तिमाहीत भारतीय कुटुंबांनी जवळपास ५० टन जुने सोने विकले. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४३% इतकी वाढ आहे.

लोक जुने दागिने का विकताहेत?

या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. परंतु गेल्या काही आठवड्यांत त्यात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आता, अनेक ग्राहकांना वाटते की किमती सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत आणि त्या आणखी खाली येऊ शकतात. ‘ईटी’च्या एका अहवालानुसार, सोन्याचा भाव अलीकडे प्रति १० ग्रॅम सुमारे १.४ लाख रुपयांच्या आसपास होता, तर बाजाराची अपेक्षा आहे की किमत सुमारे १.२ लाख रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. या भीतीमुळे भारतीय जुने दागिने स्वतःजवळ ठेवण्याऐवजी ते विकून पैसे मिळवण्याचा पर्याय निवडत आहेत. “भारतीय ग्राहक सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा वापर रोख रक्कम उभारण्यासाठी करत आहेत,” असे IBJA राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी ET ला सांगितले. ते असेही म्हणाले की, किमतीत आणखी घसरण होण्याच्या भीतीने, अनेक कुटुंबे नफा मिळवण्यासाठी आपले सोने विकत आहेत.

जागतिक दबाव आणि पुनर्वापरातील वाढ

जुने सोने विकण्याचा हा ट्रेंड अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यावर दबाव आहे. सोमवारी स्पॉट गोल्ड घसरले. अमेरिका आणि इराण यांच्यातील नव्याने निर्माण झालेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, तर यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी वाढ होण्याच्या अपेक्षेनेही सोन्यावर दबाव आणला. उच्च व्याजदर सामान्यतः सोन्याची चमक कमी करतात, कारण त्यावर कोणताही निश्चित रिटर्न मिळत नाही आणि गुंतवणूकदार व्याज देणाऱ्या मालमत्तांकडे वळू शकतात. दरम्यान, जुन्या सोन्याच्या वाढत्या विक्रीचा फायदा भारतातील संघटित सोने पुनर्वापर व्यवसायालाही होत आहे.

जुन्या सोन्याच्या व्यवहारात ४०% वाढ

लॉकरमध्ये पडून राहण्याऐवजी, जुने दागिने औपचारिक अर्थव्यवस्थेत परत येत आहेत, जिथे त्यांचे शुद्ध सोन्यात रूपांतर केले जात आहे आणि नंतर ते दागिने बनवणाऱ्या कंपन्यांना दिले जात आहेत. मुथूट एक्झिमने आपल्या १०० हून अधिक गोल्ड पॉइंट्सच्या नेटवर्कवर जुन्या सोन्याच्या व्यवहारात ४०% वाढ पाहिली आहे. “ग्राहक आता संघटित आणि पारदर्शक माध्यमांतून पडून असलेल्या सोन्याचे रोख रकमेत रूपांतर करण्यास अधिक सोयीस्कर होत आहेत,” असे मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह यांनी ET ला सांगितले.

(Declaimer: या बातमीमध्ये नमूद केलेल्या तज्ञांची आणि ब्रोकरेज कंपन्यांची मते, सूचना आणि शिफारसी या त्यांच्या स्वतःच्या आहेत. त्या Navarashtra.com च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. कोणताही गुंतवणूक किंवा ट्रेडिंगचा निर्णय घेण्यापूर्वी ब्रोकर किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Web Title: Why indians selling old gold jewellery rising gold prices see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Gold-Silver Rate
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
1

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चंदीही झाली स्वस्त! आजच्या किंमती पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव
2

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती
3

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
4

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.