भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचाच फोटो का?आरबीआयने केला मोठा खुलासा (फोटो सौजन्य-X)
RBI News Marathi : तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतीय चलनावर फक्त महात्मा गांधींचा फोटो का आहे? राष्ट्रपिता महात्मा गांधींऐवजी दुसऱ्या एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचा, संताचा किंवा नेत्याचा फोटो का नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दिले आहे. भारतीय चलनावर प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे चित्र लावण्यासाठी रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा सारख्या अनेक मोठ्या नावांचा विचार करण्यात आला होता, परंतु नंतर महात्मा गांधींच्या नावावर एकमत झाले. त्या एकमताचा परिणाम म्हणजे गांधीजींचे चित्र बऱ्याच काळापासून नोटांवर आहे. आरबीआयच्या कामकाजावर बनवलेल्या माहितीपटात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने पुढे म्हटले आहे की, “जर भारतीय चलनांवर प्रसिद्ध व्यक्तीचे चित्र असेल तर ती ओळखणे सोपे जाते. यामुळे बनावट नोटांना ओळखणेही सोपे जाते. भारतीय नोटांवर रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा आणि अबुल कलाम आझाद यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा फोटा छापण्याबाबत विचार करण्यात आला होता, मात्र शेवटी महात्मा गांधींच्या फोटोवर शिक्कामोर्तब झाले. भारतात, नोटांच्या डिझाइन आणि सुरक्षा सुविधांचा विचार करून,शेवटी महात्मा गांधींचा फोटोचा निर्णय घेण्यात आला.”
स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच ब्रिटिश काळात, भारतीय चलनांमध्ये वसाहतवाद आणि त्याच्याशी संबंधित ऐतिहासिक आणि राजकीय संदर्भ प्रतिबिंबित होत होते. त्यात वनस्पती आणि प्राण्यांचे (वाघ, हरण) चित्र होते. ब्रिटिश काळात चलनावर हत्ती आणि राजाचेही चित्र छापले जात होते. राजाच्या अलंकृत चित्रांद्वारे ब्रिटिश साम्राज्याची भव्यता दर्शविली जात होती. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर नोटेवरील चित्रात बदल झाला. काही काळ अशोक स्तंभातील सिंहाचे प्रतीक आणि इतर काही प्रसिद्ध ठिकाणांचाही फोटो चलनावर होता. विज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि हरित क्रांतीतील कामगिरीमुळे आर्यभट्ट आणि शेतकऱ्याचेही चित्र नोटेवर होते.
आरबीआयच्या मते, परंतु जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा रुपयावर छापलेले फोटो देखील हळूहळू बदलू लागले. सुरुवातीला, अशोक स्तंभावरील सिंहाचे चित्र, प्रसिद्ध ठिकाणे इत्यादी रूपयावर वापरले जात होते. हळूहळू, भारताच्या विकास आणि प्रगतीसह, रुपया या चित्रांद्वारे विकासाची कहाणी सांगू लागला. जेव्हा देश विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत होता, तेव्हा देशातील हरित क्रांतीची कामगिरी दर्शविण्यासाठी नोटांवर आर्यभट्ट आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे चित्र सुंदरपणे कोरले जात होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटनुसार, २ ऑक्टोबर १९६९ रोजी महात्मा गांधींच्या जयंतीच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच १०० रुपयांची स्मारक नोट जारी करण्यात आली. त्यावर सेवाग्राम आश्रमासह त्यांचे चित्र होते. १९८७ पासून, त्यांचे चित्र नियमितपणे रुपयावर दिसत आहे. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये, गांधींच्या चित्रासह ५०० रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. १९९६ मध्ये, नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह महात्मा गांधींच्या नोटांची मालिका सुरू करण्यात आली.
आरबीआयने एका माहितीपटाद्वारे असेही सांगितले आहे की, ते प्रिंटिंग प्रेसमधून देशाच्या कानाकोपऱ्यात पैसे पोहोचवण्यासाठी ट्रेन, जलमार्ग, हवाई मार्ग यासारख्या वाहतूक प्रणालींचा वापर करते. आरबीआयची भूमिका आणि ती कशी कार्य करते हे पहिल्यांदाच माहितीपटाच्या स्वरूपात सादर केले गेले आहे. या माहितीपटाचे नाव ‘आरबीआय अनलॉक्ड: बियॉन्ड द रुपी’ आहे. तुम्ही ते जिओ सिनेमावर पाहू शकता.