Form 16 नक्की काय आहे (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक लोकांनी त्यांचे रिटर्नदेखील भरले आहेत. जर तुम्ही कंपनीत काम करत असाल तर आयटीआर भरण्यासाठी फॉर्म १६ आवश्यक आहे.
फॉर्म १६ हे एक प्रमाणपत्र आहे जे नियोक्ता अर्थात कंपनी त्यांच्या पगारदार कर्मचाऱ्याला देतात. त्यात पगारातून कापलेल्या कराची (TDS) माहिती असते. त्यात कर्मचाऱ्याचे उत्पन्न, TDS आणि आयकर कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या सूटबद्दल माहिती असते. हे दस्तऐवज पगारदार लोकांसाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे आयटीआर भरणे सोपे होते. त्यामुळे जून महिन्यात सर्व कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येते (फोटो सौजन्य – Google Gemini AI)
Form 16 शिवाय आयटीआर दाखल करू शकतो का?
फॉर्म १६ मुळे आयटीआर दाखल करणे सोपे होते, परंतु ते आवश्यक नाही. जर तुम्हाला फॉर्म १६ मिळाला नसेल, तरीही तुम्ही ITR दाखल करू शकता. यासाठी तुम्ही पगार स्लिप, वार्षिक माहिती विवरण (AIS) आणि फॉर्म 26AS सारख्या कागदपत्रांचा वापर करू शकता. हे तुम्हाला उत्पन्न आणि टीडीएस बद्दल माहिती देतील. तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइट incometax.gov.in वरून आयटीएस आणि फॉर्म 26AS मिळेल. जर तुम्ही पहिल्यांदाच आयटीआर दाखल करणार असाल, तर तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल.
इंडस्ट्रीत धमाका करणार ‘हे’ शेअर! बाजार उघडताच ठेवा नजर, List करा तयार
वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतात का Form 16?
पगारदार व्यक्ती आयकर विभागाच्या वेबसाइटवरून थेट Form 16 डाउनलोड करू शकत नाहीत. यासाठी पॅन क्रमांक वापरता येत नाही. फक्त कंपनी जिथे कर्मचारी काम करतो त्या TRACES पोर्टलवरून Form 16 डाउनलोड करू शकते. त्यानंतर ते कर्मचाऱ्याला देते.
फॉर्म कधी मिळतो?
आयकर नियमांनुसार, कंपनीला मागील तिमाहीचे (जानेवारी-मार्च) E-TDS Return ३१ मे पर्यंत दाखल करावे लागते. त्यानंतर, त्यांना १५ दिवसांच्या आत त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ द्यावे लागतात. याचा अर्थ असा की फॉर्म १६ देण्याची शेवटची तारीख १५ जून आहे. जर तुम्हाला कंपनीकडून फॉर्म १६ अद्याप मिळाला नसेल, तर यासाठी कंपनीच्या एचआर किंवा अकाउंट्स विभागाशी बोला.
कर्मचाऱ्यांसाठी काय गरजेचे?
नाही, कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ देणे आवश्यक नाही. कंपनी कर्मचाऱ्याच्या पगारातून टीडीएस कापते तेव्हाच फॉर्म १६ जारी केला जातो. नवीन कर प्रणालीनुसार, करपात्र उत्पन्न ७ लाख रुपयांपर्यंत असल्यास कोणताही कर कापला जात नाही. तर जुन्या कर प्रणालीनुसार, करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपर्यंत असल्यास कोणताही टीडीएस आकारला जात नाही. म्हणून, कमी करपात्र उत्पन्नामुळे किंवा निवडलेल्या कर प्रणालीमुळे कोणताही कर कापला गेला नाही, तर नियोक्ता म्हणजेच कंपनी फॉर्म १६ जारी करू शकत नाही.
Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात होणार घसरण? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या