देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा घसरला, गुजरातची मोठी झेप, वाचा... सविस्तर!
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी सप्टेंबर महिना सुरु होताच गोड बातमी समोर आली आहे. ही गोड बातमी भारताच्या जीडीपीसंदर्भात आहे. जागतिक बॅंकेने भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर हा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 40 बेसिस पॉइंटने वाढवून, तो आता 7 टक्के इतका करण्यात आला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७ टक्के आर्थिक विकास दर नोंदवणार आहे.
आर्थिक विकास दर हा ७ ट्क्के राहणार
दरम्यान, यापुर्वी जागतिक बॅंकेने भारताचा आर्थिक विकास दर हा 6.6 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. ज्यात आता 40 बेसिस पॉइंटने वाढ करण्यात आली असून, आता जागतिक बॅंकेने भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक दर हा ७ ट्क्के राहणार अंदाज नव्याने जाहीर केला आहे. जागतिक बॅंकेकडून हा नवीन अंदाज जाहीर करण्यात आल्याने, भारतीय अर्थव्यवस्थेला चालू आर्थिक वर्षात वेगाने प्रगती करण्यासाठी बळ मिळणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – विकायला काढली होती सरकारने ‘ही’ कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!
काय आहे सध्याची परिस्थिती
भारतीय अर्थव्यवस्था ही आर्थिक वर्ष २०२४ जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आली आहे. भारतातील जागतिक बँकेचे देश संचालक, ऑगस्टे तानो कौमे यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, भारत आर्थिक वर्ष 24 मध्ये 8.2 टक्के जीडीपी वाढीसह सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती. सध्याच्या घडीलाही भारतीय अर्थव्यवस्था ही जोरदार गतीने वाढत आहे.
काय म्हटलंय जागतिक बॅंकेने आपल्या अहवालात
जागतिक बॅंकेने मंगळवारी (ता.३) जाहीर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, अलिकडे भारतातील कृषी क्षेत्रात चांगल्या सुधारणा झाल्या आहेत. याशिवाय ग्रामीण भागात सर्वच साधनांची मागणी वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला आधार मिळाला आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर आव्हानात्मक परिस्थिती असूनही, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. दरम्यान, भारताचा जीडीपी वाढण्यासोबतच, देशातील सेवा क्षेत्र देखील मजबूत राहणार आहे, असा विश्वासही जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये घसरण
दरम्यान, जागतिक बॅंकेकडून चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात असला तरी, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.7 टक्के नोंदवला गेला आहे. जो मागील 5 तिमाहीतींल सर्वात कमी जीडीपी म्हणून नोंदवला गेला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 8.2 टक्के इतका नोंदवला गेला होता.