Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमिन्सचा ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ उपक्रमाचे 20 वर्षे पूर्ण! 520 विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

भारत : Cummins India Limitedने ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ उपक्रमाची 20 वर्षे पूर्ण करत 520 गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. Cummins India Foundationमार्फत राबवलेल्या या उपक्रमासाठी 9,600 हून अधिक अर्ज आले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 08, 2026 | 05:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारत : Cummins India Limitedने आपल्या ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ या प्रमुख उपक्रमाची दोन दशके पूर्ण केल्याचा टप्पा गाठत 520 गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. Cummins India Foundationच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला यंदा 9,600 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते, ज्यातून कठोर निवड प्रक्रियेनंतर 520 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या निवडीत 20 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश असून उपक्रमाच्या समावेशकतेची झलक यातून दिसून येते.

विद्यार्थ्यांना स्मार्ट ‘पोलिसिंग’चे धडे! सायबर धोक्यांविरुद्ध सजगतेची माहिती, सीसीसीचे दिले प्रात्यक्षिक

गेल्या 20 वर्षांत ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ने अल्प उत्पन्न गटातील 3,100 हून अधिक विद्यार्थ्यांना सक्षम केले आहे. यामध्ये 52 टक्के विद्यार्थिनींचा सहभाग असून महिलांच्या सक्षमीकरणालाही या उपक्रमाने चालना दिली आहे. आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता हा उपक्रम विद्यार्थ्यांना सर्वांगीण पाठबळ देतो. अभियांत्रिकी शिक्षणासाठी आवश्यक असलेले शुल्क, अभ्यास साहित्य आणि इतर खर्च भागवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जातो.

पुण्यातील कमिन्स इंडिया कॅम्पसमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्वेता आर्या आणि आशिष अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी श्वेता आर्या यांनी शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी साधन असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षांना योग्य संधी मिळाल्यास ते देशाचे भविष्यातील नवप्रवर्तक आणि नेते बनू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण, रोजगारक्षमतेसाठी विशेष कार्यक्रम आणि करिअर मार्गदर्शनाचा समावेश आहे. तसेच विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांचे मजबूत नेटवर्क तयार करून दीर्घकालीन व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक वातावरण निर्माण केले जाते.

SNDT विद्यापीठात विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ; मुलींसाठी शुल्कमाफीचा निर्णय ठरला लक्षवेधी

2006 मध्ये केवळ 13 विद्यार्थ्यांसह पुण्यात सुरू झालेला हा उपक्रम आज देशभर विस्तारला आहे. पुणे, फलटण, अहिल्यानगर, इंदौर, जमशेदपूर, धाराशिव, विदिशा, गुना आणि रांची यांसारख्या औद्योगिक केंद्रांमध्ये हा उपक्रम कार्यरत असून तरुण अभियंत्यांना त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहे.

Web Title: 520 students will receive scholarships from cummins india limited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.