
फोटो सौजन्य - Social Media
मुंबई शहरात तसेच MMR विभागामध्ये ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. भविष्यामध्ये शहरात मेट्रोचे विशाल जाळे तयार होणार आहे. यामुळे अनेक उमेदवारांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. मुळात, या गोष्टीला प्रारंभही झाला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड (MMRCL)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जनरल मॅनेजर, असिस्टेंट जनरल मॅनेजर तसेच जूनियर इंजीनियरसारख्या विविध पदांसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. १४ सप्टेंबरपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. अद्याप अर्ज करण्याची मदुडत संपली नाही आहे. इच्छुक उमेदवारांना १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे, त्यामुळे दिलेल्या मुदतीमध्येच आपला अर्ज नोंदवावा अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
हे देखील वाचा : कोकण रेल्वेच्या भरतीमध्ये अर्ज करण्याची मुदत वाढवली; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी संबंधित पात्रता आणि अनुभवाची पूर्तता करणे आवश्यक आहे. खालील पदांवर ही भरती होणार आहे:
हे देखील वाचा : मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्डसाठी भरती; जाणून घ्या या व्हॅकन्सी बाबत
या भरतीसाठी उमेदवाराची नियुक्ती मुलाखतीच्या आधारे केली जाईल, तसेच उमेदवाराला शैक्षणिक अटीला पात्र असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेला उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिकमध्ये पदवीधर आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पदव्युत्तर पदवीधर डिप्लोमा/एचआरएम/बीई/बीटेक इ. असावा. या भरती विषयी सखोल माहिती अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. यासाठी उमेदवारांनी मुंबई मेट्रो रेल कॉरपोरेशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.