Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: वडाळ्यात होळीनंतर किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाला मारहाण; चौघांना अटक

मुंबईच्या वडाळ्यात होळी सेलिब्रेशननंतर किरकोळ वादातून 22 वर्षीय तुषार उज्जैनवालाचा मारहाणीत मृत्यू झाला. पाय लागल्याच्या कारणावरून वाद वाढला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 04, 2026 | 03:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • होळीनंतर पाय लागल्याच्या कारणावरून वाद
  • चौघांकडून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
  • वडाळा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई: मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला संध्याकाळी धुळवडीनंतर किरकोळ वादातून मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत एका २२ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तुषार उज्जैनवाला असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्व हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही घटना वडाळा परिसरात येथे मंगळवारी घडली आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास वडाळ्यातील कोकरीपाडा परिसरात होळी खेळल्यानंतर चार आरोपी एकत्र बसून दारू पीत होते. वातावरण शांत होते, पण त्याच वेळी तुषार आपल्या एका मित्रासोबत तिथून जात होता. यादरम्यान चालता चालता तुषारचा पाय एका आरोपीच्या पायाला लागला. केवळ याच छोट्याशा कारणावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. आरोपींनी तुषारला शिवीगाळ केली. त्यानंतर तुषार घरी गेला आणि त्याने आपल्या मोठ्या भावाला संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर तुषार भावासह पुन्हा घटनास्थळी पोहोचले. त्यावेळेस वातावरण अधिकच तापले.

Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

बेदम मारहाण करण्यास सुरवात केली

चार तरुणांनी मिळून तुषारला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा-बुक्क्यांनी मारले गेले, ज्यामुळे तुषारला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत परिस्थिती बिघडली होती. तुषारला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वादळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार

मुंबईच्या भांडुप येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनीच अल्पवयीन मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव सिद्धार्थ लोंढे ( 14 वर्ष) असे आहे. त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांनीच त्याची हत्या केली असे तपासात निष्पन्न झाले आहे. सिद्धार्थचा मृतदेह मुलुंडच्या विहार तलावाजवळ आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटले, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या असल्याचे स्पष्ट झाले.

Chhattisgarh Crime: होळीच्या रात्री मुलाकडून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; हत्येनंतर बिर्याणी खाल्ली आणि…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील वडाळा परिसरात ही घटना घडली.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: चालता चालता पाय लागल्यामुळे वाद सुरू झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चार आरोपींना अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Mumbai crime 22 year old man beaten up over minor dispute after holi in wadala four arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण
1

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
2

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
3

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
4

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.