Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व सुखी जीवनासाठी कॉलेजच्या शिक्षणा बरोबर एक तरी सृजनात्मक कला अवगत करावी हा त्यामागचा हेतू आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 30, 2025 | 06:22 PM
Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात
Follow Us
Close
Follow Us:
  • शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी;
  • ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात
अकलूज : प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व सुखी जीवनासाठी कॉलेजच्या शिक्षणा बरोबर एक तरी सृजनात्मक कला अवगत करावी असे विचार शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह-मोहिते पाटील यांनी मत व्यक्त केले ते शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये सृजनरंग महोत्सव पारितोषिक समारंभप्रसंगी बोलत होते.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा विकास केला पाहिजे, असा सल्ला मोहिते पाटील यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सृजनरंग महोत्सवामध्ये क्रिकेट, रांगोळी, वक्तृत्व, पोस्टर, मेहंदी, मोबा ईल रील व फोटो स्पर्धा व फॅशन शो स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी झालेल्या कलाकारांचा तसेच विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचा सन्मान व सत्कार प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन प्रमुख अतिथी स.म. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

विविध कलाप्रकारांचे केले सादरीकरण

कार्यक्रमाचे प्रारंभी विद्यार्थी, विद्याथ्यांनी प्रेमाची लावणी गीत, फोक आर्केष्ट्रा, हुंडाबंदी गीत, अभंग वाणी इत्यादी कलाप्रकार सादर केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ व संधी मिळावी यासाठी कार्यक्रमाचे सुनियोजन सृजनरंग कार्यक्रम समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले. पुढे त्यांनी बक्षीस वितरणाचे वाचन केले.

कार्यक्रमाला मान्यवरांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तात्या एकतपुरे, वसंत जाधव, महादेव आंधारे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रणजितसिंह माने देशमुख, डॉ. हनुमंत आवताडे, डॉ. सतीश देवकर, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. अरविंद शेंडगे, महाविद्यालयाचे प्रबंधक राजेंद्र बामणे, कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे तसेच महाविद्यालयातील सिनियर, तसेच महाविद्यालयातील ज्युनिअर, व्यावसाय विभागातील प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी वर्ग व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. झाकीर सय्यद व प्रा. विनायक सूर्यवंशी यांनी केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. जनार्धन परकाळे यांनी आभार मानले.

Exam Tips: गुण वाढवण्याची सोपी किल्ली ‘बोर्ड परीक्षेपूर्वी सुधारा हस्ताक्षर’

💡

Frequently Asked Questions

  • Que: सृजनरंग महोत्सवाच्या पारितोषिक समारंभात प्रमुख वक्ते कोण होते?

    Ans: शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह (मोहिते) पाटील हे प्रमुख वक्ते होते.

  • Que: जयसिंह मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिला?

    Ans: विद्यार्थ्यांनी कॉलेज शिक्षणासोबत किमान एक तरी सृजनात्मक कला अवगत करावी व अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विकास करावा, असा संदेश त्यांनी दिला.

  • Que: सृजनरंग महोत्सवामध्ये कोणकोणत्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते?

    Ans: क्रिकेट, रांगोळी, वक्तृत्व, पोस्टर, मेहंदी, मोबाईल रील, फोटो स्पर्धा तसेच फॅशन शो अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

Web Title: Akluj along with education creative arts should be imparted srijanrang festival award ceremony in full swing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • Akluj
  • Education Department

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.