Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

पालकांना अर्ज करताना जास्तीत जास्त दहा शाळांचे पर्याय देता येणार आहेत. निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरातील शाळा पोर्टलवर दर्शविण्यात येतील. एका शाळेत उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास पहिल्याच फेरीत सोडत काढणार.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 02:42 PM
आरटीई प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

आरटीई प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) पहिल्या प्रवेश स्तरावर 25 टक्के राखीव जागा उपलब्ध करून न देणाऱ्या तसेच आरटीई पोर्टलवर नोंदणी न करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा शाळांना तत्काळ नोटीस बजावून नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने सुधारित कार्यपद्धती जाहीर केली आहे. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जानेवारी ते एप्रिल अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. सोडतीद्वारे ज्या विद्यार्थ्यांना शाळा वाटप होईल, त्यांना संबंधित शाळेत प्रवेश देणे बंधनकारक राहील. शाळा प्रशासनाने जाणूनबुजून प्रवेश नाकारल्यास प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास मान्यता रद्द करण्याची कारवाई करावी, असे आदेशात नमूद आहे.

दहा शाळांचे पर्याय देता येणार

पालकांना अर्ज करताना जास्तीत जास्त दहा शाळांचे पर्याय देता येणार आहेत. निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरातील शाळा पोर्टलवर दर्शविण्यात येतील. एका शाळेत उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास पहिल्याच फेरीत सोडत काढली जाईल. एका विद्यार्थ्याला एकाच शाळेचे वाटप होणार असून, मिळालेल्या शाळेत प्रवेश घेणे अनिवार्य राहील; अन्यथा पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

शिस्त आणि पारदर्शकता

तक्रार योग्य ठरल्यास संबंधित शाळांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याने शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा : पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली

Web Title: Schools will be cancelled if rte admission is not granted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra Education
  • School Education

संबंधित बातम्या

मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा
1

मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा

जिल्हा परिषद शाळाही आता होणार स्मार्ट; अभियानाला राज्यात सुरुवात
2

जिल्हा परिषद शाळाही आता होणार स्मार्ट; अभियानाला राज्यात सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.