फोटो सौजन्य - Social Media
एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर), भारतीय विद्या भवनची एक आघाडीची संस्था, शैक्षणिक वर्ष २०२५-२०२७ साठी आपले पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम) आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (बिझनेस मॅनेजमेंट) (पीजीडीएम (बीएम)) प्रोग्राम्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरू करत आहे. या पोग्रॅमसाठी उमेदवारांना नोव्हेंबर २०२४ च्या २२ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२४ आहे.
पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) प्रोग्राम्सची वैशिष्ट्ये:
पीजीडीएम प्रोग्राममध्ये भारतीय नागरिकांसाठी २४० जागा आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ३६ जागा उपलब्ध आहेत. पीजीडीएम (बीएम) प्रोग्राममध्ये १२० जागा असतात. विद्यार्थ्यांना एकाच अर्जाद्वारे या दोन्ही प्रोग्राम्ससाठी अर्ज करता येतो.
निवड प्रक्रिया:
हे देखील वाचा: भारतीय पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी नियुक्तीला सुरुवात; रेल्वे रिक्रुटमेंट सेलची बंपर भरती
”एसपीजेआयएमआरचे पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) भारतातील सर्वात लोकप्रिय प्रोग्राम्स, जे आमच्या पदवीधरांना उद्योगामधील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी प्रबळ पाया देतात. कॅम्पसमध्ये मिळणाऱ्या शिक्षणामधून त्यांना आघाडीच्या कंपन्यांमध्ये सर्वोत्तम प्लेसमेंट मिळण्याची, तसेच ते समकालीन पदांसाठी सुसज्ज असण्याची खात्री मिळते,” असे एसपीजेआयएमआरच्या फुल-टाइम प्रोग्राम्सच्या असोसिएट डीन प्रो. रेणुका कामत म्हणाल्या. एसपीजेआयएमआरचे विद्यार्थी प्रतिवर्ष ३३ लाख रुपये सरासरी पगार आणि ८१ लाख रुपये सर्वोच्च पगारासह नोकरीच्या संधी मिळवतात.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: [spjimr.org](https://www.spjimr.org).