फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे रिक्रुटमेंट सेलने भरतील सुरुवात केली आहे. या भरतीमध्ये विविध विभागातील अप्रेंटिस पदाची निवड केली जाणार आहे. जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये करिअर घडवू इच्छुक आहात किंवा भारतीय रेल्वेमध्ये रोजगाराच्या संधीची वाट पाहत आहात, तर ती सुवर्ण संधी आलेली आहे. इच्छुक असाल तर कोणताही वेळ वाया न घालवता लगेच या भरतीसाठी अर्ज करा आणि भारतीय रेल्वेमध्ये आपल्या करिअरचा शुभारंभ करा. रेल्वे रिक्रुटमेंट सेलने या भरती प्रक्रियेच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भारतीमाधगये सहभाग नोंदवू इच्छुक आसनराय उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घ्यावा, जेणेकरून या भरती प्रक्रियेविषयी सखोल माहिती मिळवता येईल आणि आपल्या मनामध्ये उद्भवणाऱ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे गाठता येईल.
हे देखील वाचा : राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण; समाजसुधारक, सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाची दिली नावे
RRC ने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांची पूर्वीय रेल्वेमध्ये निवड केली जाईल. येथील विविध विभागात असलेल्या ३,११५ रिक्त जागांचा विचार या भरती प्रक्रियेमध्ये केली जाईल. या भरती प्रक्रियेमध्ये हावडा डिव्हिजन विभागातील ६५९ रिक्त जागा, लिलुआ वर्कशॉप विभागातील ६१२ रिक्त जागा, सियालदह डिव्हिजन विभागातील ४४० रिक्त जागा, कांचरापाडा वर्कशॉप विभागातील १८७ रिक्त जागा, मालदा विभागातील १३८ रिक्त जागा, आसनसोल वर्कशॉप विभागातील ४१२ रिक्त जागा तसेच जमालपुर वर्कशॉप विभागातील ६६७ रिक्त जागांचा समावेश आहे. एकंदरीत, एकूण ३,११५ रिक्त जागा अप्रेंटिसच्या पदासाठी शिल्लक आहेत. त्या जागा या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.
उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. एकूण १०० रुपयांचे भुगतान उमेदवारांना करावयाचे आहे. तसेच एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे. महिला उमेदवारांनाही अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. या अटी अधिसूचनेमध्ये नमूद असून शैक्षणिक आणि वयोमर्यादे संदर्भात आहे. शैक्षणिक अटीनुसार, उमेदवार SSC आणि HSC किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे एनसीवीटी आणि एससीवीटीद्वारे अधिसूचित व्यापारामध्ये राष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त हवे. निवड प्रक्रियेमध्ये दस्तऐवज तपासणीचा समावेश आहे तससह उमेदवारांची निवड ITI मधील गुणांच्या आधारे होईल.
हे देखील वाचा : यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन,शस्त्रक्रियेसाठी केला जाणार रोबो तंत्रज्ञानाचा वापर
अर्ज ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या rrcer.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांना अर्ज नोंदवता येणार असून अधिसूचनेचा आढावाही घेता येणार आहे.