फोटो सौजन्य - Social Media
रेल्वेमध्ये रिक्त असलेल्या पदांना भरण्यासाठी RRB तसेच RRC सतत प्रयत्नशील असते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तसेच रेल्वे रिक्रुटमेंट सेलने आयोजित केलेल्या या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी देशभरातील असंख्य उमेदवार इच्छुक असतात. यातील असंख्य जण या भरतीसाठी अर्ज करतात आणि निवड प्रकियेमध्ये पात्र ठरतात. बहुतेकदा या भरती प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात पार पडतात. या डिजिटल युगामध्ये क्वचितच काही भरती प्रकिया ऑफलाईन स्वरूपामध्ये आयोजित केल्या जातात.
नुकतेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने NTPC Recruitment ला सुरुवात केली. ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, HSC उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तिथी २० ऑक्टोबर आयोजित करण्यात आली आहे, तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना संबंधित पदांसाठी १३ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या या अधिसूचनेमध्ये अनेक अटी शर्ती नमूद आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. इच्छुक उमेदवारांनी सखोल माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण; समाजसुधारक, सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाची दिली नावे
या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे इतके असावे, तर जास्तीत जास्त ३३ वर्षे वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अनेकदा उमेदवारांकडे PC किंवा लॅपटॉपसारखे डिवाईज उपलब्ध नसल्याने मोबाईल फोनच्या साहाय्याने अर्ज करावे लागते. परंतु, जर तुम्ही रेल्वेच्या या भरतीसाठी मोबाईल फोनच्या साहाय्याने अर्ज करत आहात, तर तुम्ही फार मोठी चूक करता आहात. मोबाईल फोनवरून अर्ज करण्यापूर्वी या भरती संदर्भातील काही Guidelines ला समजून घ्या.
अधिसूचनेमध्ये नमूद आहे कि स्वतः तयार केलेला पोट्रेट किंवा मोबाईलच्या साहाय्याने घेण्यात आलेला फोटो अर्जामध्ये वापरल्यास अर्ज रद्द होण्याची खूप शक्यता आहे. अर्ज करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी तसेच अर्ज केल्या नंतर उदभवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी स्टुडिओमध्ये काढलेले फोटो वापरण्यात यावे. फोटो JPEG फॉर्मेट मध्ये असू द्या. तसेच फोटो २० ते ५० केबी इतक्या साईजचा असावा. फोटोचा माप 35mm X 45mm किंवा 320 X 240 पिक्सल आहे. मोबाईल फोनवर अर्जाचा दिरं भरताना अनेक अडचणी येत असल्यामुळे शक्यतो या कामात मोबाईल फोनचा वापर करणे टाळा. पीसी किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने अर्ज करा.