फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHA-Metro) ने कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) यासह विविध पदांसाठी एकूण 151 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी महा मेट्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahametro.org जाऊन 4 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. या भरतीमध्ये नागपूर, पुणे, नवी मुंबई आणि ठाणे इत्यादी मेट्रो प्रकल्पांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे.
उमेदवारांकडे संबंधित पदासाठी आवश्यक असलेली B.Arch, B.Tech, BE, CA किंवा ICWA पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, अधिकतम वयोमर्यादा 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची सवलत मिळेल. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. प्रथम, वैयक्तिक मुलाखत (Interview), त्यानंतर कागदपत्र पडताळणी (Document Verification), आणि शेवटी वैद्यकीय चाचणी (Medical Test). या तिन्ही टप्प्यांत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड होईल.
अर्ज करताना सर्वसामान्य व OBC प्रवर्गातील उमेदवारांना ₹400 शुल्क आकारले जाणार असून, SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी ₹100 शुल्क निश्चित करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ₹40,000 ते ₹2,80,000 पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासोबतच, अर्जाचा प्रिंटआउट आणि आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने संबंधित मेट्रो कार्यालयात पाठवावी लागतील. नागपूर मेट्रो, नवी मुंबई मेट्रो आणि ठाणे मेट्रोसाठी अर्ज हा “जनरल मॅनेजर (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, दीक्षाभूमी जवळ, नागपूर – 440010” या पत्त्यावर पाठवावा लागेल. तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी अर्ज “जनरल मॅनेजर (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानाडे मार्ग, पुणे – 411005” येथे पाठवायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.