फोटो सौजन्य - Social Media
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PO पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात कामाची संधी शोधत असाल तर ही भरती खास तुमच्यासाठी आहे. अर्जाचे निकष पात्र करत तुम्ही या भरतीसाठी अर्ज मागवू शकता आणि नियुक्त होऊ शकता. २४ जून २०२५ रोजी ही भरती सुरु होणार असून उमेदवारांना १४ जुलैपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकूण ५४१ रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली असून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. या संबंधित अधिसूचना जाहीर करण्यात आली असून चला तर या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ही रक्कम General / OBC / EWS या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. भरतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीधर असणे अनिवार्य आहे. CA, Engineering, Medical या क्षेत्रातील उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या अटीनुसार, किमान २१ वर्षे ते ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये Preliminary Examination पात्र करणे अनिवार्य आहे. तर पुढील दोन टप्प्यात उमेदवारांना Main Examination (Objective + Descriptive) आणि Psychometric Test, Group Exercise & Interview या टप्प्यांना पात्र करावे लागणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज?