फोटो सौजन्य - Social Media
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), जालंधर येथे बिगर-शिक्षकी कर्मचाऱ्यांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 105 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. ज्युनिअर इंजिनिअर, टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन, ऑफिस अटेण्डंट, स्टेनोग्राफर, ज्युनिअर असिस्टंट यांसह विविध पदांसाठी ही संधी उपलब्ध झाली आहे. ही भरती शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत असलेल्या या प्रतिष्ठित तांत्रिक संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.
महत्वाच्या तारखा
या भरतीची अधिकृत अधिसूचना 26 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्जाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन 27 सप्टेंबर 2025 रोजी संपणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज शुल्क
पदांची माहिती व पात्रता
एकूण 105 पदे या भरतीत उपलब्ध असून त्यापैकी 58 पदांसाठी पात्रता तपशील स्वतंत्र अधिसूचनेत पाहता येणार आहे. वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असेल. उमेदवारांचे वय 27 सप्टेंबर 2025 रोजीच्या स्थितीनुसार गणले जाणार आहे. आरक्षित प्रवर्गासाठी शासनमान्य सवलती देण्यात येतील.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाईल:
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी www.nitj.ac.in या संकेतस्थळावर जाऊन 28 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज सादर करावा. नोंदणी करताना वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. फॉर्म भरताना शैक्षणिक कागदपत्रे व छायाचित्र अपलोड करावे लागतील. तसेच अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.
या भरतीमुळे तांत्रिक क्षेत्रात स्थिर व सुरक्षित करिअरची दारे उघडणार असून इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.