Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

बारावीच्या परीक्षांदरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून कडक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिकेत स्वतःची ओळख दर्शविल्यास संबंधित विषयाची परीक्षा रद्द होऊ शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 01, 2026 | 06:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी विद्यार्थ्यांसाठी कडक सूचना जारी केली आहे. उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारे स्वतःची ओळख दर्शविल्यास तो गंभीर गैरप्रकार मानला जाईल आणि संबंधित विषयाची परीक्षा रद्द होऊन विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण ठरवले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

CAPF असिस्टंट कमांडंट परीक्षा 2026 ची अधिसूचना जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज; पदवीधर असणे आवश्यक

मंडळाने स्पष्ट केले आहे की उत्तरपत्रिकेत नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शाळा किंवा परीक्षा केंद्राचे नाव लिहिणे, ठरलेल्या जागेशिवाय बैठक क्रमांक नमूद करणे, तसेच कोणतीही विशिष्ट खूण, चिन्ह, संदेश, प्रार्थना, विनंती किंवा चित्र काढणे हे नियमभंग मानले जाणार आहे. अशा प्रकारे ओळख पटवण्याचा प्रयत्न हा परीक्षेच्या निष्पक्षतेला बाधा आणणारा गंभीर गुन्हा समजला जातो. जानेवारी २०२० पासून मंडळाने ‘परीक्षार्थी गैरमार्ग-शिक्षा सूची’ लागू केली असून त्यात एकूण ३२ प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश आहे. परीक्षेनंतर उघड होणाऱ्या गैरप्रकारांवरही मंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. उत्तरपत्रिका अनधिकृतरीत्या बाहेर नेणे, त्यात फेरफार करणे, इतरांकडून उत्तर लिहून घेणे, परीक्षकांशी संपर्क साधणे किंवा कागदपत्रांमध्ये बदल करणे यांसारख्या प्रकारांमध्ये संबंधित विषय किंवा संपूर्ण परीक्षाच रद्द केली जाऊ शकते.

याशिवाय काही गंभीर प्रकरणांना दंडनीय गुन्ह्याचे स्वरूप देण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका लीक करणे, डिजिटल माध्यमातून गैरप्रकार करणे, उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करणे किंवा लाच देणे यांसारख्या घटनांमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल होऊन सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांवर परीक्षाबंदीही लागू होऊ शकते.

विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी मंडळाने विविध माहितीपर व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर उपलब्ध केले आहेत. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना नियमांची स्पष्ट माहिती देणे आणि नकळत होणारे गैरप्रकार टाळणे हा आहे. कोल्हापूर व कोकण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

Success Story : NASA सोडून भारतात परतले; 5 वेळा करिअर बदललं… कधीकाळी स्पेस सायंटिस्ट होते अंकुर वारिकू 

मंडळाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, उत्तरपत्रिकेत कोणतीही ओळख दर्शविणे म्हणजे थेट गैरमार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Marks in the paper will be considered a crime strict action against post exam misconduct

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
1

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र
2

Numerology: तुमच्या Employee Code मध्येही ‘हा’ नंबर आहे का ? नोकरीत प्रमोशन अन् करिअरबाबत काय सांगते अंकशास्त्र

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
3

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Captain Smit Machhar: जिगरबाज कॅप्टन! रक्ताने लथपथ असतानाही १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार किती शिकलेत? जाणून घ्या
4

Captain Smit Machhar: जिगरबाज कॅप्टन! रक्ताने लथपथ असतानाही १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार किती शिकलेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.