फोटो सौजन्य - Social Media
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विभागात इन्स्पेक्टर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना narcoticsindia.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या ६० दिवसांपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ९४ पदे भरली जाणार आहेत.
इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे काही आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच, अर्जदाराकडे किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा ५६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे ५६ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.
ही भरती भारतभरातील विविध शहरांमध्ये होणार आहे. संबंधित पदे भुवनेश्वर, कोलकाता, पाटणा, रायपूर, रांची, दिल्ली, गोरखपूर, लखनौ, अगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, अमृतसर, चंदीगड, जम्मू, श्रीनगर, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, विशाखापट्टणम, गोवा, मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, इंदूर, जोधपूर आणि सिलिगुडी या शहरांसाठी उपलब्ध आहेत.
उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जाचा नमुना अधिकृत अधिसूचनेमध्ये उपलब्ध आहे. अर्ज व्यवस्थित भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज पाठवण्याचा पत्ता: डिप्टी डायरेक्टर जनरल (P&A), नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो, वेस्ट ब्लॉक नंबर-1, विंग नंबर-05, आर. के. पुरम, नवी दिल्ली – 110066. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ मार्च २०२५ ते ९ मे २०२५ आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
ही भरती डेप्युटेशन (deputation) आधारावर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे जोडून अर्ज पाठवावा. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही, त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. अर्ज पाठवताना उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट (narcoticsindia.nic.in) वर भेट द्यावी आणि अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. ही नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असल्याने इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता अर्ज करावा!