फोटो सौजन्य - Social Media
मुंबईमध्ये हळुवार मेट्रोचा Craze वाढत आहे. मुंबईत हळूहळू मेट्रोचा प्रसार केला जात आहे. फक्त मुंबई नव्हे तर इतर शहरांमध्येही मेट्रो मोठ्या प्रमाणात नागरिकांद्वारे Utilise केली जात आहे. अशात अनेकांना ट्रेनचा लोको पायलट बनण्याची इच्छा असते. अशामध्ये काहींची हीच इच्छा मेट्रोची Craze पाहता मेट्रो ड्राइव्हर बनण्यात रूपांतर झाली आहे. जर तुम्हालाही मेट्रो ड्राइव्हर म्हणून पुढे करिअर करायचे आहे? किंवा या क्षेत्रात पदार्पण करायचे आहे? तर नक्कीच हे लेख संपूर्ण वाचा.
Metro ड्राइव्हर बनण्यासाठी काही शैक्षणिक योग्यतेस पात्र करावे लागते. मुळात, Metro ड्राइव्हर बनण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित क्षेत्रामध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीधर आहात किंवा पॉलिटेक्निक विषयात डिप्लोमाधारक आहात तर तुम्हाला प्राथमिकता मिळेल. तसेच या संबंधित अनेक भरती वेळोवेळी निघत असतात.
यामध्ये एक वयोमर्यादे संबंधित अट नेहमीच नमूद असते. किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या पदासाठी नियुक्त केले जाते. आरक्षित वर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. मेट्रो ड्राइव्हर पदासाठी इच्छुक उमेदवारांना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. दृष्टीमध्ये कमतरता असणाऱ्या उमेदवारांना या पदासाठी नियुक्त केले जात नाही.
मेट्रो ड्राइव्हरच्या भरती दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन तसेच इतर मेट्रो कॉर्पोरेशन आयोजित करतात. भरती सुरु होण्याअगोदर अधिसूचना जाहीर केली जाते. उमेदवार या अधिसूचना आढावा घेत, सगळे निकष पात्र करत या पदासाठी अर्ज करू शकतात आणि निवडीस पात्र होऊ शकतात. या भरतीमध्ये उमेदवारांना परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत गणित, रिजनिंग आणि सामान्य जागृकतेविषयी प्रश्न केले जाते. दस्तऐवज पडताळणीसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. तसेच उमेदवारांना या संबंधित प्रशिक्षण दिले जाईल.
मेट्रो ड्राइव्हर म्हणून रुजू होणाऱ्या उमेदवारांना दरमाह वेतन म्हणून सुरुवातीला ३९,००० रुपये दिले जातात. तर पुढे ही वेतनवाढ ९१,००० रुपयांपर्यंत पोहचते.