Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होईल पूर्ण! महिला उमेदवारांनाही करता येणार अर्ज

असम रायफल्स क्रीडा कोटा भरती २०२५ ही खेळाडूंना सैन्यात दाखल होण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीतून उमेदवारांना नोकरीसोबतच देशसेवेची संधी मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 17, 2025 | 04:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

असम रायफल्सने क्रीडा कोट्यातून जनरल ड्युटी रायफलमन/रायफलवूमन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण ६९ रिक्त पदे भरली जाणार असून त्यामध्ये ३० पदे पुरुष उमेदवारांसाठी तर ३९ पदे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ assamrifles.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. ही संधी विशेषतः अशा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे ज्यांनी शैक्षणिक पात्रतेसह क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.

IOCL अप्रेन्टिस पदासाठी अर्ज सुरु! आजच करा अर्ज; ‘या’ तारखेपर्यंत अर्जाची विन्डो खुली

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच ते मान्यताप्राप्त खेळाडू असावेत. वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२५ रोजी गणली जाणार असून उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. शासन नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.

निवड प्रक्रियेत उमेदवारांची शारीरिक चाचणी, मोटर एबिलिटी टेस्ट, ट्रायल टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांतून कसून चाचणी घेतली जाणार आहे. प्रत्येक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांची अंतिम निवड होणार आहे. यामध्ये शारीरिक क्षमतेसोबतच खेळातील प्राविण्य आणि वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिसूचना नीट वाचून आपली पात्रता तपासावी. त्यानंतर दिलेल्या “Apply Online” लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करताना नियमानुसार शुल्क भरावे लागणार असून अंतिम टप्प्यात अर्जाची प्रिंट काढून ती जतन करून ठेवावी.

LIC मध्ये भरतीची संधी! आजच करा अर्ज, भरतीविषयक अधिक माहिती जाणून घ्या

असम रायफल्स ही देशातील सर्वात जुन्या पॅरामिलिटरी फोर्सपैकी एक असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या भरतीद्वारे निवड होणाऱ्या तरुणांना केवळ सरकारी नोकरीची संधीच मिळणार नाही तर देशसेवेची संधी देखील उपलब्ध होणार आहे. खेळाडूंसाठी राखीव असलेली ही भरती त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे.

Web Title: Assam rifles has recruited general duty riflemanriflewoman posts from sports quota

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Assam

संबंधित बातम्या

Assam ONGC gas leak : ONGC च्या प्रकल्पातून मोठी गॅस गळती; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
1

Assam ONGC gas leak : ONGC च्या प्रकल्पातून मोठी गॅस गळती; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

Assam flood : 50 मृत्यू, 1500 गावं पाण्याखाली; आसाममध्ये मुसळधार पाऊस अन् भूस्खलनाचा तांडव
2

Assam flood : 50 मृत्यू, 1500 गावं पाण्याखाली; आसाममध्ये मुसळधार पाऊस अन् भूस्खलनाचा तांडव

Crime News : संतापजनक! आजोबा पैशासाठी बनले राक्षस , 5 हजार रुपयांसाठी विकले नातीला
3

Crime News : संतापजनक! आजोबा पैशासाठी बनले राक्षस , 5 हजार रुपयांसाठी विकले नातीला

Kamakhya Temple: 52 शक्तीपीठांपैकी एक; ‘या’ रहस्यांनी भरलेले आहे कामाख्या देवीचे मंदिर
4

Kamakhya Temple: 52 शक्तीपीठांपैकी एक; ‘या’ रहस्यांनी भरलेले आहे कामाख्या देवीचे मंदिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.