Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (GD) व रायफलमन पदांसाठी भरती! त्वरित करा अर्ज

SSC मार्फत CAPFs, SSF आणि असम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (GD) व रायफलमन पदांसाठी २५,४८७ जागांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 07, 2025 | 08:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs), SSF आणि असम रायफल्समधील रायफलमन (GD) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये एकूण २५,४८७ पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. SSF मधील पदे संपूर्ण देशातून भरली जाणार असून इतर CAPFs मधील रिक्त जागा राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या कोटानुसार भरल्या जातील.

२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी

या भरतीत BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF या दलांमध्ये पुरुषांसाठी 23,467 आणि महिलांसाठी 2,020 अशा एकूण 25,487 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रता म्हणून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेनुसार पुरुषांची उंची 170 सेमी आणि महिलांची 157 सेमी ठेवण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांना 80 सेमी छाती आणि 5 सेमी फुगवटा आवश्यक आहे. शारीरिक चाचणीत पुरुषांनी 5 किमी धाव 24 मिनिटांत तर महिलांनी 1.6 किमी धाव 8 मिनिटांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षांदरम्यान असावी. आरक्षित प्रवर्गांसाठी शासकीय नियमांनुसार सवलत दिली जाईल.

या पदांसाठी वेतनमान लेव्हल-3 नुसार प्रति महिना ₹21,700 ते ₹69,100 इतके राहणार आहे. अर्ज शुल्क सामान्य प्रवर्गासाठी ₹100 असून महिला, SC, ST आणि माजी सैनिक उमेदवारांना शुल्कातून संपूर्ण सूट देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये होणार आहे – संगणक आधारित परीक्षा (CBT), शारीरिक चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि दस्तऐवज तपासणी. परीक्षेला एकूण 60 मिनिटे दिली जातील व पेपरमध्ये 80 प्रश्नांसाठी 160 गुण असतील. निगेटिव्ह मार्किंगनुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. प्रश्नपत्रिका मराठी सहित 13 भाषांमध्ये उपलब्ध असेल.

Career Options for Girls After 12th: बारावीनंतर मुलींसाठी उत्तम करिअरचे पर्याय!

अर्ज करताना उमेदवारांनी 10वीची मार्कशीट, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ईमेल आयडी, मोबाईल नंबर तसेच स्वाक्षरी असलेला पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर एक-वेळ नोंदणी (OTR) करून सुरू होते. लॉगिन केल्यानंतर ‘Constable (GD) Examination 2026’ लिंकवर जाऊन आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत. शुल्क भरल्यानंतर अंतिम सबमिशन करून फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवणे महत्त्वाचे आहे. SSC मार्फत येणारी ही मोठी भरती संधी असल्याने पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीकडे लक्ष द्यावे.

Web Title: Assam rifles recruitment for constable gd and rifleman posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • SSC
  • SSC Board

संबंधित बातम्या

तयारीला लागा..! ssc.gov.in वर लक्ष ठेवा, लवकरच जाहीर होईल SSC CGL Notification 2026
1

तयारीला लागा..! ssc.gov.in वर लक्ष ठेवा, लवकरच जाहीर होईल SSC CGL Notification 2026

विद्यार्थ्यांना मिळणार संयुक्त प्रमाणपत्र! १० वी, १२ वीसाठी त्रुटी कमी करण्याचा उपाय
2

विद्यार्थ्यांना मिळणार संयुक्त प्रमाणपत्र! १० वी, १२ वीसाठी त्रुटी कमी करण्याचा उपाय

विद्यार्थ्यांना आता नो टेंशन…! शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे, 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर
3

विद्यार्थ्यांना आता नो टेंशन…! शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे, 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर

SSC आणि HSC चा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर! आता प्रतीक्षा झाली पुरे; ‘या’ टप्प्यांनी पाहू शकता Result
4

SSC आणि HSC चा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर! आता प्रतीक्षा झाली पुरे; ‘या’ टप्प्यांनी पाहू शकता Result

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.