Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अब तेरा क्या होगा B.El.Ed? ३० वर्षानंतर ‘या’ कोर्सला मिळणार पूर्णविराम

2026 पासून B.El.Ed कोर्स कायमस्वरूपी बंद होणार असून, त्याचे रूपांतर ITEP (इंटिग्रेटेड टीचर एजुकेशन प्रोग्राम) मध्ये करण्यात येईल. ITEP हा चार वर्षांचा शिक्षक प्रशिक्षण कोर्स आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 28, 2025 | 06:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शिक्षक बनण्यासाठी अनेक कोर्सेस आहेत. जर तुम्ही या क्षेत्रात काम करू पाहत आहात तर अनेक जण तुम्हाला बीएलएड पदवी घेण्याचा सल्ला देतील. पण आता हा कोर्स कायमस्वरूपी बंद होत आहे. २०२६ मध्ये नव्या एज्युकेशन पॉलिसीनुसार बीएलएड हा ४ वर्षांचा कोर्स पूर्णपणे बंद होणार आहे. हा कोर्स दिल्ली विद्यापीठात सुरु होता. याबाबत नवीन गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत.

‘सीईटी-अटल’ उपक्रमात १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; योग्य करिअर निवडीसाठी मदतीचा हात

या मोठ्या निर्णयावर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) चेअरमन पंकज अरोड़ा म्हणाले, “या वर्षापर्यंत B.El.Ed मध्ये प्रवेश सुरू राहतील, पण 2026 पासून नव्या प्रवेशांना बंदी असेल. आम्ही प्रस्ताव दिला आहे की हा कार्यक्रम ITEP मध्ये रूपांतरित केला जावा. आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुसार नवीन प्रोग्रॅम्स आणत आहोत, ज्यामुळे जुन्या कोर्सेसना नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल.” या कार्यक्रमाला २०२६-२७ शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पुढच्या वर्षीपासून नव्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे.

B.El.Ed चे रूपांतर ITEP मध्ये करण्यात येईल. B.El.Ed चे शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना ITEP मध्ये स्थानांतरित व्हावे लागेल. म्हणजे आता जे B.El.Ed करत आहेत त्यांना ITEP मध्ये प्रवेश देण्यात येईल. ITEP हा चार वर्षांचा शिक्षकी प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे, जो 12वी नंतर करता येतो. हा कोर्स BA B.Ed, BSc B.Ed आणि BCom B.Ed या स्वरूपात उपलब्ध असेल.

2023-24 मध्ये हा कोर्स काही संस्थांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला होता. आता 2025-26 पासून तो नियमित अभ्यासक्रम म्हणून लागू केला जाणार आहे. ITEPमध्ये योग शिक्षण, शारीरिक शिक्षण, संस्कृत शिक्षण आणि कला शिक्षण या चार विशेष अभ्यासक्रमांचा समावेश असेल. दिल्ली विद्यापीठाने 1994-95 शैक्षणिक वर्षात B.El.Ed कार्यक्रम सुरू केला होता. NCTEने 1999 मध्ये या अभ्यासक्रमासाठी पहिल्यांदाच अधिकृत मान्यता आणि नियमन जारी केले.

विवा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्सव; स्पर्धा विजेत्यांना करण्यात आले पुरस्कारीत

2014 मध्ये NCTEने शिक्षक शिक्षण कार्यक्रमांसाठी नवीन निकष ठरवले, ज्यामध्ये B.El.Ed हा एक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम म्हणून परिभाषित करण्यात आला. हा अभ्यासक्रम प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर (इयत्ता 1 ते 8) अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तयार करतो. 2026 नंतर हा अभ्यासक्रम पूर्णपणे ITEP मध्ये समाविष्ट केला जाणार आहे.

Web Title: Beled course will get full break after 30 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Educational News

संबंधित बातम्या

Karad News: कराडच्या लेकींची आयआयटी मुंबईच्या स्पर्धेत बाजी! ‘इकोपल्स बस स्टॉप’ प्रकल्पाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
1

Karad News: कराडच्या लेकींची आयआयटी मुंबईच्या स्पर्धेत बाजी! ‘इकोपल्स बस स्टॉप’ प्रकल्पाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक

JNV Entrance Results 2026: जवाहर नवोदय प्रवेशाचा ‘सातारा पॅटर्न’! ११ हजार परीक्षार्थींमधून झेडपीच्या मुलांनी उमटवला ठसा
2

JNV Entrance Results 2026: जवाहर नवोदय प्रवेशाचा ‘सातारा पॅटर्न’! ११ हजार परीक्षार्थींमधून झेडपीच्या मुलांनी उमटवला ठसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.