Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्किटेक्चर क्षेत्रात घडवा करिअर! ‘हे’ टिप्स येतील तुमच्या कामी

आर्किटेक्चर क्षेत्र सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालून जागतिक स्तरावर करिअर घडवण्याची संधी देते. बीआर्क कोर्सनंतर आर्किटेक्ट, डिझायनर, प्लॅनर ते सरकारी संस्थांमध्ये नोकरी अशा अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 23, 2025 | 06:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशातील संसद भवन, चंदीगडचे शहर नियोजन, साबरमती गांधी मेमोरियल, भारत भवन, रॉक गार्डन यांसारख्या भव्य स्थळांमागे जगप्रसिद्ध आर्किटेक्ट्सचे योगदान आहे. एडविन लुटियन्स, हर्बर्ट बेकर, बिमल पटेल, ला कार्बूजिए, चार्ल्स कोरिया आणि नेकचंद सैनी यांनी आपल्या कल्पकतेतून जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यातून हे दिसून येते की आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर केल्यास जागतिक पातळीवर मोठी प्रतिष्ठा मिळू शकते.

युवकांना Cop 30 साठी पर्यावरणविषयक चर्चेची संधी! मुंबईत ४५ युवकांचा सहभाग

आर्किटेक्चर म्हणजे फक्त इमारतीचे आराखडे तयार करणे नव्हे तर सामाजिक, तांत्रिक आणि पर्यावरणीय गरजांचा विचार करून आधुनिक रचना घडवण्याचे एक शास्त्र आहे. यात कलात्मक कौशल्य, गणितीय क्षमता, निरीक्षणशक्ती, धैर्य, कायदेशीर भाषेची समज, नेतृत्वकौशल्य, स्केचिंगचा सराव असे अनेक गुण आवश्यक असतात.

या क्षेत्रात प्रवेशासाठी 12वी नंतर नेशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) किंवा JEE माध्यमातून प्रवेश मिळतो. NATA द्वारे देशभरातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये पाच वर्षांचा बीआर्क (B.Arch) कोर्स करता येतो. आयआयटीमध्ये प्रवेशासाठी JEE Main, JEE Advanced व AAT परीक्षा आवश्यक आहे, तर NIT आणि SPA संस्था JEE Main पेपर II व AAT द्वारे प्रवेश देतात.

भारतामध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण देणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये CEPT Ahmedabad, SPA Delhi, सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (मुंबई), IES कॉलेज (मुंबई), JNTU (हैदराबाद), IIT खडगपूर, चंदीगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज यांचा समावेश होतो.

नवी मुंबई विमानतळावर भरती! नोकरी शोधताय? मग वाट कसली पाहताय? करा की अर्ज

करिअरच्या दृष्टीने आर्किटेक्ट म्हणून आर्किटेक्चर फर्म्स, कन्स्ट्रक्शन कंपन्या, प्रायव्हेट बिल्डर्स तसेच स्वतंत्र सल्लागार म्हणून काम करण्याची संधी आहे. तसेच हाऊसिंग बोर्ड, PWD, पुरातत्त्व विभाग, रेल्वे, HUDCO, राष्ट्रीय भवन संगठन यांसारख्या सरकारी संस्थांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट, अर्बन डिझायनर, लँडस्केप आर्किटेक्ट, इंटीरियर डिझायनर, अर्बन प्लॅनर, प्रोजेक्ट मॅनेजर, कन्सल्टंट किंवा अध्यापन क्षेत्रात करिअर घडवता येते. सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्याची सांगड घालणाऱ्या या क्षेत्रात करिअर केल्यास भविष्य उज्ज्वल ठरते.

Web Title: Build a career in the field of architecture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • career guide

संबंधित बातम्या

NHIDCL Vacancy 2025: भारत सरकारच्या कंपनीमध्ये व्हा Deputy Manager, GATE साठी उत्तम संधी, 1.60 लाख मिळणार पगार
1

NHIDCL Vacancy 2025: भारत सरकारच्या कंपनीमध्ये व्हा Deputy Manager, GATE साठी उत्तम संधी, 1.60 लाख मिळणार पगार

SPJIMR पीजीपीडीएम बॅच २७ साठी अर्जप्रक्रिया सुरू, कुठे करावा अर्ज
2

SPJIMR पीजीपीडीएम बॅच २७ साठी अर्जप्रक्रिया सुरू, कुठे करावा अर्ज

SSC ची सोशल मीडियाची एंट्री, परीक्षेपासून निकालापर्यंत…इथे मिळेल सर्व तपशीलवार अपडेट
3

SSC ची सोशल मीडियाची एंट्री, परीक्षेपासून निकालापर्यंत…इथे मिळेल सर्व तपशीलवार अपडेट

MP NEET UG 2025 Counselling: एमपी नीट मॉप-अप राऊंड कौन्सिलिंग स्थगित, उमेदवारांना करावं लागेल ‘हे’ काम
4

MP NEET UG 2025 Counselling: एमपी नीट मॉप-अप राऊंड कौन्सिलिंग स्थगित, उमेदवारांना करावं लागेल ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.