फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही कामाच्या शोधात आहात तर तुमच्या संशोधनाला आता पूर्णविराम लागणार आहे. कारण नवी मुंबई विमानतळाला आता काही माणसांची गरज भासणार आहे, त्यामुळे भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भरती थर्ड पार्टीद्वारे आयोजित करण्यात आले असून भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरण्यात येणार आहेत. या पदांमध्ये पोर्टर, ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स, टेक्निशियन तसेच कस्टमर सर्व्हिस एजंट्स पदांचा समावेश आहे. विविध पदांसाठी पात्रता निकष वेगवगळे आहेत. त्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीचा आढावा घेऊनच अर्ज करण्याच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात यावी.
पोर्टर पदासाठी किमान ९वी पास असणे आवश्यक आहे. २५ ते २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या पदासाठी अरुज करू शकतात. ड्रायव्हर्स पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त ३४ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांकडे लायन्सस असणे आवश्यक आहे. नसेल तर आधी ते काढून घेण्यात यावे. जर तुमचे वय ३२ ते ४० वर्षांदरम्यान आहे तर तुम्ही ऑपरेटर पदासाठी पात्र आहात. यामध्ये तुम्हाला ग्राउंडवर मशीन हाताळावी लागेल, ज्यासाठी किमान ५ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानाचे ज्ञान असणारे उमेदवार टेक्निशियन म्हणून काम करू शकतात. डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येऊ शकते. किमान २७ वर्षे वय या भरतीसाठी निश्चित करण्यात आले आहे. कस्टमर सर्व्हिस एन्जेन्ट पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर काही पात्रता निकषांचे पालन करा. एक तर अनुभव ३ वर्षांचा हवा. २१ वर्षे ते २७ वर्षे वय निश्चित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेले जाहिरातीचा आढावा घेण्यात यावा.