Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देश-विदेशातील उद्योगांमध्ये भरपूर रोजगार संधी! बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये घडवा भवितव्य

बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग हा कोर्स वस्तूंची रचना, उत्पादन आणि तंत्रज्ञानात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअर पर्याय ठरतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 09, 2025 | 07:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • या क्षेत्रात संसाधन व्यवस्थापन आणि आधुनिक मशीनरीचा वापर याबद्दल सखोल माहिती
  • औद्योगिक व्यवस्थापन क्षेत्रात या कोर्सची मोठी मागणी
  • निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि तांत्रिक मनोवृत्तीचे द्योतक बनते
बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग हा कोर्स सर्जनशील, तंत्रज्ञानप्रेमी आणि वस्तूंची रचना-उत्पादन कसे होते याबद्दल नैसर्गिक कुतूहल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअर पर्याय ठरतो. लहानपणी अनेक मुलांना खेळणी किंवा घरातील वस्तू उघडून पाहण्याची आणि पुन्हा नीट जोडण्याची आवड असते, आणि हीच उत्सुकता पुढे जाऊन त्यांच्या निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि तांत्रिक मनोवृत्तीचे द्योतक बनते. अशाच विद्यार्थ्यांना प्रॉडक्शन इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम योग्य दिशा देतो, कारण या क्षेत्रात उत्पादनांची निर्मिती, त्यांची गुणवत्ता सुधारणा, उत्पादनक्षमता वाढवणे, डिझाइनिंग, संसाधन व्यवस्थापन आणि आधुनिक मशीनरीचा वापर याबद्दल सखोल माहिती दिली जाते. उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, मशीन डिझाईन, रोबोटिक्स आणि औद्योगिक व्यवस्थापन क्षेत्रात या कोर्सची मोठी मागणी आहे.

भारतातील पहिलाच ग्लोबल B. Design (Hons.) प्रोग्राम! उपलब्ध होणार आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी

हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे, फिजिक्स-केमिस्ट्री-मॅथ्स (PCM) विषय शिकलेला असणे आणि इंग्रजीचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. वय १७ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणारे विद्यार्थीच या कोर्सला अर्ज करू शकतात. प्रवेश प्रामुख्याने JEE Main आणि JEE Advanced या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांद्वारे मिळतो, तर WBJEE, VITEEE, KEAM आणि SRMJEEE यांसारख्या राज्य आणि विद्यापीठस्तरावरील परीक्षा देखील उपलब्ध आहेत. काही प्रतिष्ठित संस्थांकडून स्वतंत्र प्रवेश परिक्षाही घेतल्या जातात.

या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, मशीन डिझाईन, क्वालिटी कंट्रोल, प्रॉडक्शन प्लॅनिंग, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स, मटेरियल सायन्स, तसेच CAD/CAM यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा अभ्यास करायला मिळतो. उद्योगभेटी, वर्कशॉप प्रॅक्टिकल्स आणि प्रोजेक्ट वर्कद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचा अनुभव मिळतो, जे त्यांच्या भविष्यातील व्यावसायिक करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. देशातील NIT त्रिची, NIT कालिकत, JNTU हैदराबाद, NIT आगरतळा, वोक्सन विद्यापीठ, BIT रांची, ग्रेटर नोएडा इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, BML मुंजाल युनिव्हर्सिटी, कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी आणि UEM कोलकाता या संस्था प्रॉडक्शन इंजिनिअरिंगसाठी सर्वोत्तम मानल्या जातात.

स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून करिअर करायचे आहे? ६ वर्षांचा MBBS आवश्यक! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

योग्य कौशल्ये, तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक समज असल्यास उत्पादन क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध असून देश-विदेशातील मोठ्या उद्योगसमूहांमध्ये उत्कृष्ट करिअर करता येते. म्हणूनच, नवीन वस्तू समजून घेण्याची, तयार करण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग हे उज्ज्वल भविष्यासाठीचे एक उत्तम आणि स्थिर निवड ठरते.

Web Title: Build your future with btech in production engineering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 07:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.