- GLS ही संस्था भारतात त्यांचा अधिकृत अभ्यासक्रम देणारी एकमेव यूनिवर्सिटी
- जागतिक स्तरावर काम करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन आणि Exposure मिळणार
- भागीदारी भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला बळ देईल आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल
AI च्या युगात ही 5 कौशल्य आवश्यक, देश-विदेशात लाखो पगाराच्या नोकऱ्यांची संधी
1927 मध्ये स्थापन झालेली GLS यूनिवर्सिटी गुजरातमधील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. SAE Institute सोबतच्या या सहकार्याने भारतातील वाढत्या अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग उद्योगांना कुशल आणि जागतिक दर्जाचे क्रिएटिव्ह प्रोफेशनल्स मिळणार आहेत. नवितास समूहाचा भाग असलेले SAE हे जगातील सर्वोत्तम प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणाऱ्या संस्थांमध्ये मोडते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक प्रमाणपत्र, अत्याधुनिक साधने, स्किल-बेस्ड ट्रेनिंग आणि इंडस्ट्री-रेडी प्रॅक्टिकल अनुभव मिळणार आहे.
या प्रोग्रामची घोषणा GLS यूनिवर्सिटीमध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आली. GLS चे अध्यक्ष सुधीर नानावटी, कार्यकारी संचालक डॉ. चांदनी कपाडिया तसेच नवितास समूहाचे वरिष्ठ अधिकारी जेंना सचिल्लर आणि स्टीव्ह हिर्ड उपस्थित होते. GLS आणि SAE यांच्या या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक कौशल्यच नव्हे, तर जागतिक स्तरावर काम करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन आणि Exposure मिळणार आहे.
अभ्यासक्रम पूर्णपणे प्रोजेक्ट-बेस्ड असून, विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवसापासून स्टुडिओ लेव्हलवरील प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जाईल. आंतरराष्ट्रीय स्टडी एक्स्चेंज, ग्लोबल मेंटॉरशिप, तसेच SAE च्या वर्ल्डवाइड क्रिएटिव्ह कम्युनिटीचा भाग होण्याची संधीही उपलब्ध असेल. GLS च्या 1000 पेक्षा जास्त इंडस्ट्री पार्टनरशिपमुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि टॉप अॅनिमेशन, VFX व गेमिंग कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची संधी मिळणार आहे.
RYIM 2025: वैज्ञानिक उत्सुकता आणि सहकार्याचा जयघोष! मुंबईत ‘रिजनल यंग इन्व्हेस्टिगेटर्स मीटिंग २०२५’ चा उत्साहपूर्ण समारोप
या उपक्रमाबद्दल GLS अध्यक्ष सुधीर नानावटी यांनी सांगितले की, ही भागीदारी भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला बळ देईल आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल. तर डॉ. चांदनी कपाडिया यांनी सांगितले की, भारतातील क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजची वाढ पाहता हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यास सक्षम करेल. नवितासच्या जेंना सचिल्लर यांनीही भारतात अधिकृत प्रवेश मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एकूणच, GLS आणि SAE Institute यांच्या भागीदारीमुळे भारतातील क्रिएटिव्ह मीडिया आणि टेक्नॉलॉजी शिक्षणाला जागतिक स्तरावरील दिशा मिळणार आहे. अॅनिमेशन, VFX आणि गेम डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम एक मोठी संधी ठरणार आहे.













