तोल जाऊन रेल्वेखाली आल्याने पायांचा चेंदामेंदा
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) पुन्हा एकदा नवीन भरती प्रक्रियेसह आले आहे. भारतात रोजगार निर्मितीच्या प्रमुख संस्थेपैकी एक असणाऱ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने नॉन टेक्निकल पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्याचे योजिले आहे. RRB NTPC भरती २०२४ च्या अनुसार, उमेदवारांची भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये काम करू पाहणारे तसचे रोजगाराच्या संधीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना या भरती लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने या भरती प्रक्रियेसंबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा नक्की घ्यावा, जेणेकरून या भरतीची सखोल माहिती अभ्यासात यावी आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी.
हे देखील वाचा : भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदी भरतीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे आयोजित या भरती प्रक्रियेमध्ये ११,५५८ पदांचा विचार केला जाणार आहे. नॉन टेक्निकल स्टाफच्या या भरती प्रक्रियेत जून क्लर्क कम टायपिस्टच्या ९९० जागा, अकाउंट क्लर्क कम टायपिस्टच्या ३६१ जागा, स्थायी कम टिकट क्लर्कच्या २०२२ जागा, ट्रेन क्लर्कच्या ७२ जागांचा विचार केला जाणार आहे. तसेच गुड्स ट्रेन मॅनेजरचे ३१४४ जागा, चीफ जनरल क्लर्क कम टायपिस्टच्या १७३६ जागा, स्टेशन मास्टरचे ९९४ जागा, ज्युनिअर अकाउंटंटचे १५०७ तर सीनियर क्लर्क कम टिकटिस्टचे ७३२ जागांचा विचार या भरती प्रक्रियेमध्ये केला जाणार आहे.
संपूर्ण देशभरामध्ये ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज नोंदवावे. महत्वाचे म्हणजे या अर्ज प्रकियेमध्ये पदवीधर तसेच १२ उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांचा विचार केला गेला आहे. प्रत्येक पदासाठी विविध शैक्षणिक अट आहे. तसेच या अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेविषयकी अटी शर्ती जाहीर केल्या गेल्या आहेत.
हे देखील वाचा : ECGC मध्ये PO च्या भरतीला सुरूवात; अशा प्रकारे करता येईल अर्ज
जूनियर क्लर्क सह टाइपिस्ट, लेखा लिपिक सह टाइपिस्ट, ट्रेन क्लर्क तसेच वाणिज्यिक सह टिकट क्लर्क या पदांसाठी १२ उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात. परंतु, अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ३३ वर्षे निश्चित केले गेले आहे. ऐकेनाद्रीत, १८ वर्षे ते ३३ वर्षे आयु असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर मालगाड़ी प्रबंधक, मुख्य वाणिज्य सह टिकट पर्यवेक्षक, वरिष्ठ क्लर्क सह टाइपिस्ट, जूनियर अकाउंट असिस्टेंट सह टाइपिस्ट तसेच स्टेशन मास्टरच्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३६ वर्षे असावे.