फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौसेनेमध्ये भरती होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौसेनेमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये SSC ऑफिसर पदातील विविध जागांचा विचार केला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे या भरती मध्ये पुरुष तसेच महिला दोन्ही सहभाग नोंदवू शकतात. भारतीय नौसेनेने या भरती प्रक्रियेची अधिसूचना २ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर केली होती. भारतातील अनेक तरुणमंडळी या भरतीची प्रतीक्षा करत होती. अखेर या प्रतिक्षेला पूर्णविराम लागलेला आहे.
हे देखील वाचा : मीटर रीडर पदासाठी बंपर भरती; अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
१४ सप्टेंबरपासून या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांना २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भारतीसंबंधित सखोल माहिती भारतीय नौसेनेने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये जाहीर करण्यात आली आहे. भारतीय नौसेनेने एकूण २५० रिक्त जागांना भरण्यासाठी या भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सामान्य जीएस एक्स, वायु नियंत्रण वाहतूक एटीसी, नौसेना वायु सुरक्षा अधिकारी एनआयओ, पायल्ट, लॉजिस्टिक्स आणि नौसेना आयुध निरीक्षण केंद्र (NAIC) मधील विविध पदांचा विचार केला जात आहे.
अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे. तसेच नियुक्त उमेदवाराला भारतभर कुठेही नोकरी लागण्याची शक्यता आहे. अर्थात ही भरती प्रक्रिया देशभरामध्ये राबवली जात आहे. या सरकारी क्षेत्रातील नोकरीच्या माध्यमातून साधारणपणे ५६,१०० रुपये दरमाह वेतन नियुक्त झालेल्या उमेदवाराला देण्यात येईल. लक्षात असुद्या कि, या भरतीमध्ये विविध पदांचा विचार केला जात असल्यामुळे प्रत्येक पदासाठी दिल्या जाणाऱ्या वेतनाची रक्कम उमेदवाराच्या अनुभवानुसार वेगवेगळी असू शकते.
हे देखील वाचा : ECGC मध्ये PO च्या भरतीला सुरूवात; अशा प्रकारे करता येईल अर्ज
मुळात या भरती प्रकियेमध्ये अर्ज करताना उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. विविध पदांसाठी शैक्षणिक अटी आणि वयोमर्यादा एकमेकांपासून भिन्न आहेत. एकंदरीत, नेव्ही पायलटच्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बी.ई/बी.टेक. मध्ये किमान ६०% गुणांनी उत्तीर्ण असावा. तसेच त्याने HSC आणि SSC परीक्षेत किमान ६०% गुण प्राप्त केले असावे. तसेच सामान्य सेवा GS पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सारखेच शैक्षणिक अटींचे पालन करावे लागणार आहे. Air Traffic Control तसेच Naval Air Operations Officer च्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने बी.ई/बी.टेक मध्ये किमान ६०% गुण मिळवणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.