Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा ! आता करायचं तरी काय ? उत्तरपत्रिकांचे गठे, ‘पॅट’ परीक्षा, जनगणना आणि मतदारयादी शिक्षकांची होतेय दैना

बोर्डाचे पेपर तपासणीच्या भरीला भर म्हणजे राष्ट्रीय जनगणना आणि त्यातच मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण यासगळ्या कामांकरीता मनुष्यबळ कमी पडत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 22, 2026 | 03:50 PM
अरे देवा ! आता करायचं तरी काय ? उत्तरपत्रिकांचे गठे, ‘पॅट’ परीक्षा, जनगणना आणि मतदारयादी शिक्षकांची होतेय दैना
Follow Us
Close
Follow Us:
  • अरे देवा ! आता करायचं तरी काय ?
  • उत्तरपत्रिकांचे गठे, ‘पॅट’ परीक्षा, जनगणना आणि मतदारयादी शिक्षकांची होतेय दैना
दहावीच्या परिक्षा संपल्या खऱ्या पण शिक्षकांना मात्र आता देखील जराही उसंत नाही. एकीकडे उत्तर पत्रिका तपासणी, , ‘पॅट’ परीक्षा आणि दुसरीकडे मतदारयादी या सगळ्यामध्ये शिक्षकांची दैना उडाल्याचं समोर आलं आहे. एकाच वेळी होणाऱ्या अनेक कामांमुळे शिक्षक वर्गात तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. बोर्डाचे पेपर तपासणीच्या भरीला भर म्हणजे राष्ट्रीय जनगणना आणि त्यातच मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण यासगळ्या कामांकरीता मनुष्यबळ कमी पडत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

एप्रिलमध्ये होणारी जनगणना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्य (बीएलओ) ऑर्डर आलेल्या शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बोर्डाच्या नियमांनुसार, उत्तरपत्रिका वेळेत तपासून सादर करणं अनिवार्य आहे. मात्र या सगळ्यात शाळांमध्ये इतर परीक्षा सुरू असून, पुढील शैक्षणिक नियोजनाची जबाबदारीही शिक्षकांवर आहे. एकंदरीतच मनुष्यबळ कमी पडत असल्याने शिक्षकांचं नियोजित वेळापत्रक पूर्णपणे ढासळत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 2800 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

एुप्रिल महिना म्हणजे वार्षिक परिक्षांचा काळ. या काळात विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या अभ्यासाचे मूल्यमापन होते. जर या दरम्यानच शिक्षक जर जनगणना किंवा मतदारयादीच्या कामात गुंतले, तर परीक्षांचे नियोजन, देखरेख आणि उत्तरपत्रिका तपासणी वेळेत पूर्ण होणार तरी कशी ? असा सवाल शिक्षक वर्गातून उठत आहे. शासनाने मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण कामांचे नियोजन करताना शैक्षणिक कामकाजावर होणाऱ्या परिणामांची दखल घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

जबरदस्तीने बीएलओच्या दिलेल्या ऑर्डरमुळे शिक्षक कुठे आणि कसं पुरे पडणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून बाजूला करावं आणि मुलांच्या वार्षिक परिक्षा तसंच उत्तरपत्रिका तपासणीसाठी वेळेत पुर्ण करण्यासाठी बाबत शासनाने विचार करावा. असं पिंपरी-चिंचवड
मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संतोष काळे यांनी सांगितलं.

सध्याच्या घडीला शिक्षक वर्गाची तारेवरची कसरत होताना दिसतेय त्यामुळे या सगळ्यामुळे शासनाने मनुष्यबळ लक्षात घेत अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांना बाजूला करावं अशी मागणी करण्यात येत आहे.

AI Alpha School: एआय अल्फा स्कूल म्हणजे काय? ग्रॅज्युएशनपर्यंत मुलं कोटींमध्ये करणार कमाई, नाहीतर पैसे परत

Web Title: Bunches of answer sheets pat exam census and voter list are causing teachers a lot of trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Education Department
  • Educational News

संबंधित बातम्या

अकोल्यात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संपावर! ‘या’ तारखेपासून दिला आंदोलनाचा इशारा
1

अकोल्यात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संपावर! ‘या’ तारखेपासून दिला आंदोलनाचा इशारा

ऐतिहासिक! 10 वी अन् 12 वीच्या परीक्षेत १०३ कर्मचारी निलंबित; Education Department ची धडक कारवाई
2

ऐतिहासिक! 10 वी अन् 12 वीच्या परीक्षेत १०३ कर्मचारी निलंबित; Education Department ची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.