फोटो सौजन्य - Social Media
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अनेक वारंवार केली जाणारी कामे हाती घेत असताना भारतीय प्रोफेशनल्स अधिक मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि परस्पर संवादावर आधारित करिअरला प्राधान्य देत आहेत. नवीन लिंक्डइन डेटानुसार एचआर व्यावसायिक ग्राहक पाठिंबा आणि प्रशासन क्षेत्राकडे वळले आहेत, फायनान्स प्रोफेशनल्स लेखा व ग्राहक पाठिंब्याला प्राधान्य देत आहेत, तर अभियंते शिक्षण क्षेत्रात संधी शोधत आहेत.
याचबरोबर धोरणात्मक सल्लामसलत, व्यवसाय विकास, उत्पादन व्यवस्थापन आणि रिअल इस्टेटसारख्या उच्च मूल्य क्षेत्रांतही कर्मचारी करिअर घडवत आहेत. यामुळे मानवी क्षमतांची मागणी असलेली पदे अधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसते. लिंक्डइन इंडियाच्या वर्कफोर्स कॉन्फिडन्स सर्व्हेनुसार 62% प्रोफेशनल्सना वाटते की एआय त्यांच्या कामाचा वेग वाढवून उत्पादकता सुधारते, तर 59% प्रोफेशनल्स एआयमुळे करिअरच्या नव्या संधी मिळतील या बाबत उत्सुक आहेत.
लिंक्डइनच्या करिअर तज्ज्ञ निरजिता बॅनर्जी यांनी सांगितले की, “आजचे करिअर एआयसह तयार होत असून उमेदवारांनी कौशल्यांवर आधारित नेतृत्व करणे, आपल्या कामाचा पुरावा देणे आणि एआय साधनांचा उपयोग करून अर्ज व मुलाखत तयारी करणे महत्त्वाचे ठरत आहे. मानवी निर्णयक्षमता आणि एआयचे संयोजन हे तरुण प्रोफेशनल्ससाठी संधी वाढवणारे ठरेल.”
लिंक्डइनचे AI-powered Job Search Tool आता नोकरी शोधण्याच्या पद्धतीत बदल घडवत आहे. उमेदवार आपल्या शब्दांमध्ये पदांचे वर्णन करू शकतात आणि एआय त्यांच्या कौशल्ये व ध्येयांशी जुळणाऱ्या संधी दाखवते.
कंपनीने रोजगार शोधासाठी काही टिप्सही दिल्या आहेत:
सध्या मीडिया, एचआर, इंजिनिअरिंग आणि मार्केटिंग क्षेत्रांत एआयला मोठ्या प्रमाणात सहायक साधन म्हणून स्वीकारलं जात आहे. त्यामुळे कर्मचारी वारंवार होणाऱ्या कामांपासून मुक्त होऊन धोरणात्मक आणि उच्च मूल्य कामावर लक्ष केंद्रित करत आहेत. लिंक्डइननं पुढाकार घेत भारतातील प्रोफेशनल्सना एआयच्या युगात स्मार्टपणे करिअर घडवण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि साधने उपलब्ध करून दिली आहेत.