फोटो सौजन्य - Social Media
CBSE बोर्डाने दहावी तसेच बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात केली आहे. १५ फेब्रुवारी पासून या परीक्षांना सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परीक्षांना हिरवा सिग्नल मिळाला आहे. CBSE चे यंदाचे उमेदवार मोठ्या संख्येने परीक्षास्थळांना उपस्थिती लावत आहेत. दहावीच्या उमेदवारांना आज इंग्रजी भाषा परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागले होते. तसेच बारावीच्या उमेदवारांना एंटरप्रेन्योरशिप या विषयाच्या पारिखस्वेअस्थी उपस्थित राहावेCBSE बोर्ड परीक्षांना झाली सुरुवात; विद्यार्थ्यांनो! जाणून घ्या संपूर्ण ‘Guidelines’
लागले होते. या परीक्षे संदर्भात काही महत्वाच्या बाबी शिक्षकांनी सांगितल्या आहेत.
त्यांच्या मतांनुसार, पेपरची भाषा स्पष्ट होती. प्रश्नांना समजणे आणि त्यांची उत्तरे देणे खूप सोपे होते. शिक्षक म्हणतात की आजच्या परीक्षेत इंग्रजी साहित्यासंबंधित प्रश्न अधिक होते. CBSEच्या बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांसाठी एकूण 24,12,072 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. तसेच एकूण ८४ विषयांसाठी हे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत एकूण 17,88,165 विद्यार्थी 120 विषयांसाठी परीक्षा देणार आहेत.
‘या’ परीक्षा संदर्भात काही Guidelines जाहीर करण्यात आले आहेत. त्या Guidelines चे पालन उमेदवारांना करावे लागणार आहे. चला तर मग जणूं घेऊयात, या जाहीर Guidelines बद्दल:
सीबीएसई बोर्ड परीक्षा 2025 एकाच सत्रात घेतली जाणार असून ती सकाळी 10.30 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1.30 वाजेपर्यंत चालेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजल्यानंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, परीक्षा संपल्यानंतर दुपारी 1:30 वाजण्यापूर्वी कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रवेशपत्रासोबत त्यांच्या शाळेचा ओळखपत्र (स्कूल आयडी कार्ड) बरोबर आणणे बंधनकारक आहे. तर, खाजगी विद्यालयातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासोबत सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र देखील आणावे. नियमित विद्यार्थ्यांना फक्त शालेय गणवेशातच परीक्षेला प्रवेश दिला जाईल, तर खाजगी विद्यार्थ्यांनी हलक्या आणि साध्या कपड्यांमध्ये परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे.
सीबीएसई बोर्डाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांना वगळता इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात खाण्या-पिण्याच्या वस्तू (बंद किंवा उघडलेल्या) आणण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच, बोर्डाने विद्यार्थ्यांना अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. जर कोणताही विद्यार्थी अशा अफवांमध्ये सहभागी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी.