Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीईटी कक्षाकडून दुसऱ्या संधीच्या सीईटीच्या तारखा जाहीर! दुसऱ्या संधीची CET कधी होणार?

State Common Entrance Test Cell Maharashtra कडून दुसऱ्या संधीच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एमबीए/एमएमएस तसेच MHT CET पीसीएम आणि पीसीबी गटांच्या परीक्षा ९ ते २१ मे २०२६ दरम्यान होणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2026 | 07:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब : State Common Entrance Test Cell Maharashtra कडून दुसऱ्या संधीच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. एमबीए/एमएमएस तसेच MHT CET पीसीएम आणि पीसीबी गटांच्या परीक्षा ९ ते २१ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. या दुसऱ्या संधीच्या परीक्षेला राज्यभरातून तब्बल ४ लाख ९२ हजार ३८३ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुलींसाठी सुवर्णसंधी! Amazonच्या उपक्रमाचा देशभरात विस्तार; ५०० नव्या शिष्यवृत्तींची घोषणा

दरम्यान, पहिल्या सत्रातील परीक्षांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. एकूण ८ लाख ९६ हजार २३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८ लाख ३३ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामुळे ९२.९९ टक्के उपस्थिती नोंदवली गेली, तर ६२ हजार ७५४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले होते. या आकडेवारीवरून सीईटी परीक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित होते.

यावर्षी प्रथमच सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काही प्रमुख व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा प्रवेश परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना किमान एक परीक्षा देणे अनिवार्य असून, दुसरी परीक्षा देणे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. अर्ज करतानाच विद्यार्थ्यांनी एक किंवा दोन परीक्षा देण्याचा पर्याय निवडलेला आहे.

MIAM Charitable Trust चा उपक्रम, युवकांचा फायदा! 20 पेक्षा जास्त आदिवासी तरुणांना मिळाली नोकरी 

महत्त्वाचे म्हणजे, जर विद्यार्थ्याने दोन्ही संधींच्या परीक्षा दिल्या असतील, तर त्यातील ज्या परीक्षेत जास्त पर्सेंटाइल मिळाले असेल, तो निकाल अंतिम प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारण्याची आणि अधिक चांगला निकाल मिळवण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा ठरत असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अधिक आत्मविश्वास निर्माण करणारा आहे.

Web Title: Cet cell announces dates for the second opportunity cet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • CET
  • CET Exam

संबंधित बातम्या

एमबीए-एमएमएस दुसऱ्या संधीचा सीईटी निकाल जाहीर! एकूण ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, सर्व विद्यार्थी राज्यातील
1

एमबीए-एमएमएस दुसऱ्या संधीचा सीईटी निकाल जाहीर! एकूण ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण, सर्व विद्यार्थी राज्यातील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.