फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)च्या प्रवेश परीक्षेला उत्तीर्ण करणे आणि IIT सारख्या टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये स्थान मिळवणे काही सोपे काम नाही आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने अनेक उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करता तसेच उपस्थित राहतात. त्यातील बहुतेक अजून या परीक्षेला पास करतात. जास्त रँकने गुण मिळवणारे तसेच उत्तीर्ण होणारे विद्यार्थी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी उत्सुक असतात. यातील अनेकांचे स्वप्न अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नाव कमावणे असते. परंतु, IIT मध्ये चांगल्या रँकने उत्तीर्ण होऊन आपले नाव प्रसिद्ध करून एका विद्यार्थ्याने चक्क IIT च सोडून दिली आहे.
हे देखील वाचा : भारतीय कोस्ट गार्डमध्ये भरतीला सुरुवात; लाखोंच्या घरामध्ये मिळणार वेतन
चित्रांग मुर्डिया या विद्यार्थ्याने २०१४ मध्ये आयआयटी-जेईई परीक्षेत एअर 1 रँक मिळवले होते. यानंतर त्याला आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश मिळाला पण वर्षभरातच त्याने टॉप कॉलेजमधील बी.टेक कोर्स सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले आहेत. अनेक जण हैराण झाले आहेत. त्याने असे का केले असावे? असा प्रश्न त्याला सतत विचारले जात आहे. त्याच्या परिचयांकडून तो अभियांत्रिकीमध्ये करिअर घडवेल आणि जगातील जागतिक दर्जावर प्रसिद्ध असणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपनीमध्ये काम करेल अशी अपेक्षा वर्तवली जात होती.
IIT मध्ये चित्रांग मुर्डिया यांनी पहिली रँक मिळवली होती. त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉंबे मध्ये प्रवेश मिळाला होता. एक वर्षांसाठी चित्रांग मुर्डिया याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉंबेमध्ये शिक्षण घेतेले दरम्यान त्याने IIT बॉंबेमधून दाखल घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम रँक मिळवून तंत्रज्ञान क्षेत्रातील इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतल्या असल्यामुळे अनेकांच्या डोक्यामध्ये प्रश्नांचा महासागर आला आहे.
हे देखील वाचा : मुंबईतील माझगाव येथील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन !
यासंदर्भात चित्रांग मुर्डिया याने पोस्ट केली आहे,” या निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले, अगदी माझ्या मित्रांनाही. लोक म्हणायचे की एवढा मोठा निर्णय घेण्यास खूप लहान आहेस, या निर्णयातून IIT सारखे करिअर गमावशील.” IIT बॉंबे सोडण्यावर चित्रांगने प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे म्हणणे आहे कि IIT सोडून स्वतःच्या आवडीच्या विषयाकडे वळणे इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.